चिपी ते कवठी 11 kV लाईनचे काम पूर्ण
निलेश जोशी | कुडाळ : गेल्या अनेक वर्षाची मागणी असलेलं चिपी ते कवठी या 11 KV लाईनचे काम पूर्ण झाले असून गेली अनेक वर्ष ही जोडणी अपूर्ण होती. या संदर्भात माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते यांनी आमदार निलेश राणे यांचयाजवळ ही जोडणी त्वरित पुर्ण व्हावी याबाबत मागणी केली. त्यानुसार ही जोडणी पूर्ण झाली असून कवठी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच स्वाती करलकर, शिवसेना कार्यकर्ते मनीष वाडयेकर यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

