गोगावले साहेबानी राणे साहेब यांच्याकडे याबाबत सन्मानपूर्वक विश्लेषण करावे ही अपेक्षा
शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर यांची प्रतिक्रिया
सिंधुदुर्ग : पावशी येथे झालेल्या शिवसेना जिल्हा मेळाव्याच्या निमित्ताने आमचे नेते कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले साहेब यांच्या कडून आदरणीय खासदार नारायण राणे साहेबांच्या राजकीय वाटचाली बाबत विश्लेषण करताना काही अनपेक्षित वक्तव्य केली गेली. शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री, केंद्रिय मंत्री असा ज्यांचा राजकारणात आदर्शवत प्रवास आहे. अश्या व्यक्तीच्या बाबतीत अनावधानाने का असेल पण असं वक्तव्य समर्थनीय नाही. आमचे राजकीय वय खूप कमी आहे. पण या मेळाव्यात बसलेले असंख्य शिवसैनिक हे राणे साहेबाना, त्यांच्या कुटुंबाला दैवत मानणारे आहेत. कित्येक जणांचे राजकीय प्रणेते राणे साहेबच आहेत. त्यामुळे या वक्तव्याची राणे साहेब हे भाजपचे मोठे नेते असल्याने त्यांच्या कार्यकर्त्याना चीड येणे आणि ते व्यक्त होणे हे स्वाभाविकच आहे. पण या वक्तव्याचा त्रास त्यांना मानणाऱ्या शिवसैनिकांना पण झाला असणार. त्यामूळे या वक्तव्याबद्दल आपल्या नेत्यानी आदरणीय राणे साहेब यांच्याकडे सन्मानपूर्वक व्यक्त झालं पाहिजे. अशी भावना त्यांच्या मनात नक्कीच असणार. युती, आघाड्या या राजकारणातील घडामोडी घडतच राहणार, पण मागील चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत राणे साहेबानी, त्यांच्या कुटुंबाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपली आदरयुक्त छबी सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्या मध्ये जपली आहे. त्यामूळे या वक्तव्याबाबत आमचे आदरणीय नेते भरतशेठ गोगावले साहेब हे नारायण राणे साहेब यांच्याकडे सन्मानपूर्वक व्यक्त होतील आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्याच्या भावनेचा आदर करतील अशी अपेक्षा आहे. अश्या भावना मालवणचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धी पत्रातून व्यक्त केल्या आहेत. असे माझे वैयक्तिक मत आहे. असे महेश कांदळगांवकर यांनी स्पष्ट केले.

