Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

प्रीपेड स्मार्ट मिटरबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करा !

प्रीपेड स्मार्ट मिटरबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करा !

शिवसेनेचे अतुल बंगे यांची शासनाकडे मागणी

निलेश जोशी | कुडाळ : स्मार्ट प्रीपेड मिटर बसवु नये यासाठी आंदोलन उभे झाले तरीही चोरुन मीटर बसवल्याने चारशे रुपये बिला ऐवजी चार हजार बिले येत आहेत. विज ग्राहक ही बिले भरुच शकत नाहीत याबाबत शासनाने ग्राहकांचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा अशी मागणी शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केली आहे.
स्मार्ट प्रिपेड मिटर बसवु नये यासाठी मोठे आंदोलन माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली झाले. यावेळी विज मंडळ अधिकारी यांनी हे मिटर बसवले जाणार नाहीत, असे लेखी पत्र देऊन सुद्धा सध्या गावागावात विज मिटर बदलुन स्मार्ट प्रीपेड मिटर बसवले जात असून गावातील विज ग्राहक यांनी विरोध केला तरी स्थानिक वायरमन यांच्या दबावाखाली विज मिटर बसविले जात आहेत. जे मिटर नविन बसवले आहेत, त्यांची बिले चारशेच्या ऐवजी चारहजार येत असल्याने ही बिले भरणे सर्व सामान्य ग्राहकांना शक्य होत नसल्याने ग्राहक हतबल झाले आहेत. अजुनही शासनाने विचार करुन स्मार्ट प्रीपेड बसविण्यात येऊ नये अशी मागणी श्री बंगे यांनी केली आहे.

rapan bottom