Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

रिक्षा चालकांचे जिल्हाभरातून होतेय कौतुक

रिक्षा चालकांचे जिल्हाभरातून होतेय कौतुक

मालवण | कट्टा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालक मालक यांच्या प्रामाणिक सेवेचा प्रत्यय वारंवार समोर येत असतो. त्याचाच प्रत्यय मालवण तालुक्यातील कट्टा येथील कै. अशोक फाटक स्मृती श्री. लिंगेश्वर रिक्षा सेना असोसिएशन कट्टा स्टॅण्ड येथील रिक्षा चालक श्रीकांत भोगटे यांच्या प्रामाणिक व तत्पर कामगिरीतून आला.

भोगटे यांनी रिक्षा प्रवासा दरम्यान एका महिलेला सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन येथून प्रवास करताना ओरोस महामार्ग फाटा पर्यंत सोडले. त्यानंतर भोगटे कट्टा येथे आपल्या घरी निघून आले. घरी आल्यानंतर त्यांच्या रिक्षात त्यांना एक बॅग असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी लागलीच सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन येथील रिक्षा चालक नितीन तिरोडकर यांना कॉल केला व घडलेली घटना सांगितली. ती बॅग आपल्या रिक्षात बसलेल्या त्या महिलेचीच असावी असा अंदाज व्यक्त केला. भोगटे यांनी ती बॅग विश्वासाने रिक्षाचालक तिरोडकर यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर नितीन तिरोडकर यांनी ओरोस पोलीस स्टेशनला जात सर्व घटना पोलिसांना सांगून पोलिसांच्या मदतीने संबंधित महिलेचा शोध घेत ती बॅग पूर्णपणे खात्री करून संबंधित महिलेला परत केली आहे.

महत्वाचे साहित्य असलेली आपली हरवलेली बॅग पुन्हा मिळाल्याने त्या महिलेच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तिने या दोन्ही रिक्षा चालकांचे मनापासून आभार मानले. श्रीकांत भोगटे व नितीन

तिरोडकर यां दोन्ही रिक्षा चालकांनी दाखवलेल्या प्रामाणिक पणाने जिल्हाभरातुन कौतुक केले जात आहे. पोलिस बांधवानी कौतुक केले. तसेच कांता भोगटे व नितीन तिरोडकर या दोन्ही रिक्षा चालकांचे कै. अशोक फाटक स्मृती प्रित्यर्थ श्री लिंगेश्वर रिक्षा सेना असोसिएशन कट्टा स्टॅण्ड यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

rapan bottom