Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

डिसेंबर-जानेवारीत राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन

डिसेंबर-जानेवारीत राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन

कुडाळमध्ये खो-खो राज्यस्तरीय पंच परीक्षेचे उद्घाटन

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ येथे खो-खो विश्वचषक स्पर्धा आयोजीत केली असून , त्याचबरोबर देशपातळीवर होणारी खो खो लिग स्पर्धा देखील लोकप्रिय होत आहे. अशावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात अगदी तळागाळात खो-खो खेळ वाढवण्याची जबाबदारी आता आपणा सर्वांची आहे. मी तुमच्या सोबतच आहे. हे शिवधनुष्य आपण सर्वांच्या सोबतीने समर्थपणे पेलू असा विश्वास दि अमॅच्युअर खो-खो असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केला. कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो-खो पंच परीक्षेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यंदा डिसेंबर-जानेवारीत राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खो-खोचा प्रचार, प्रसार आणि विकास करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर दिली आहे. हे करण्यासाठी आपण सर्वांनी मैदानात उतरले पाहिजे. जेथे जेथे गरज लागेल तेथे मी तुमच्यासोबत आहे असे अमित सामंत यांनी सांगितले. शनिवारी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था येथे परीक्षार्थीसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अमित सामंत यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खो-खोची लोकप्रियता वाढविण्यासाठी येत्या डिसेंबर - जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय खो खो स्पर्धा आयोजित करणार असल्याचेही अमित सामंत यांनी सांगितले. यावेळी
बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी या राज्य स्पर्धेसाठी आमचे शैक्षणिक संकुल सदैव तयार असल्याचे सांगितले. मोबाईलच्या जमान्यात मुले आणि तरुण पिढी मैदानापासून दुरावत आहे. त्यांना परत मैदानावर आणण्यासाठी क्रीडा चळवळ राबविणे आवश्यक आहे. यासाठी खो खो सारख्या पारंपारिक खेळाला पर्याय नाही, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्यावतीने रविवार दिनांक २९ जून रोजी राज्यस्तरीय खोखो पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे केंद्र ठेवण्यात आले आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २७ खो-खो प्रेमींनी या राज्य पंच परीक्षेला प्रतिसाद दिला.
यावेळी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे माजी सरचिटणीस संदीप तावडे, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे तांत्रिक समिती सदस्य कृष्णा करंजळकर, जिल्हा संघटनेचे सचिव संजय पेंडूरकर, उपाध्यक्ष श्रीनाथ फणसेकर, खजिनदार दुर्वांक मेस्त्री, मंदार गोसावी, क्रिस्टन रॉड्रिक्स, तेजस्वी नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. दिनांक २० एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्यावतीने जिल्हा खो खो पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पंचांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. जिल्हा पंच परीक्षेत संपूर्ण जिल्ह्यातून २९ परीक्षार्थी सहभागी झाले होते. जिल्ह्याचा १०० टक्के निकाल लागला.
रविवार दिनांक २९ जून रोजी सकाळी ८.०० वाजल्यापासून लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक स्वरूपात राज्य पंच परीक्षा होणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या पंचांना ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय पंच शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र खो खो संघटनेच्या नियमानुसार दरवर्षी होणाऱ्या पंच शिबिरात सहभागी होणाऱ्या पंचांना वर्षभर होणाऱ्या राज्य स्पर्धेत पंच म्हणून काम करण्याची संधी दिली जाते.

rapan bottom