Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

पाट हायस्कूलच्या कलाकारांचे निवती पोलीस स्टेशन कडून कौतुक

पाट हायस्कूलच्या कलाकारांचे निवती पोलीस स्टेशन कडून कौतुक

'नशामुक्ती वॉल' ठरली लक्षणीय

निलेश जोशी | कुडाळ : अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने पाट हायस्कुलने चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सहभागी होऊन बक्षिसे मिळविलेल्या हायस्कुलच्या मुलांचे निवती पोलीस ठाण्याच्या वतीने कौतुक करण्यात आले. या चित्रांचे 'नशामुक्ती' वॉल या नावाने पोलीस ठाण्यात भरविण्यात आलेले प्रदर्शन लक्षणीय ठरले.
अमली पदार्थ मोहीम राबविताना पाट हायस्कूलमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 150 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा तीन स्तरावर ही स्पर्धा घेण्यात आली. यामधील प्रत्येक गटातील प्रथम पाच निवडक चित्रांना पोलीस स्टेशन तर्फे भीमसेन गायकवाड यांच्याकडून बक्षीसे देण्यात आली. यावेळी निवडक 50 चित्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन पोलीस स्टेशनमध्ये आयोजित करण्यात आले.
कलाशिक्षक संदीप साळस्कर यांच्या सहकार्याने पन्नास फूट बाय तीस फूट एवढ्या मोठ्या भिंतीवर एका वृक्षाचे रचना करून त्याला चित्र लटकवलेली आहेत. नशा मुक्ती वॉल अगदी मुख्य बैठकीच्या ठिकाणी केल्यामुळे लक्षवेधी ठरत आहे.


या स्पर्धेतील विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे -
इयत्ता पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक अर्जुन कृष्णा कुंभार, द्वितीय क्रमांक यश सिताराम राऊत, तृतीय क्रमांक धनिषा निलेश परब, चौथा क्रमांक भार्गवी हेमंत केसरकर आणि पाचवा क्रमांक युगा उमेश कानडे.
माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक अंकुर विनोद मेथर, द्वितीय क्रमांक दिशा श्रीकृष्ण सामंत, तृतीय क्रमांक अथर्व विनोद शेगले, चौथा क्रमांक अथर्व आनंद म्हापणकर, पाचवा क्रमांक धनदा वैभव सावंत .
उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक ऋग्वेद कुसाजी कांबळी, द्वितीय क्रमांक जीवन प्रशांत गोसावी आणि तृतीय क्रमांक प्रतीक जगन्नाथ मेथर.
या सर्व विद्यार्थ्यांचे भीमसेन गायकवाड यांनी निवती पोलीस स्टेशन तर्फे भेटवस्तू देऊन कौतुक केले आणि विद्यार्थी शिक्षक पालक यांना मार्गदर्शनही केले. यावेळी संस्था कार्याध्यक्ष विजय ठाकूर, मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर, कलाशिक्षक संदीप साळसकर, समीर र्शिके, तानाजी काळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

rapan bottom