Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

खरारे पेंडूर ग्रामपंचायत प्रथम | प्रधानमंत्री आवास योजना

खरारे पेंडूर ग्रामपंचायत प्रथम | प्रधानमंत्री आवास योजना

महा आवास अभियान तालुकास्तरीय पुरस्कारांचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते वितरण

मालवण | प्रतिनिधी : प्रत्येकाला घर मिळावे आणि सर्वांमध्ये स्थैर्य निर्माण होऊन राहणीमान सुधारणे हे उद्दिष्ट समोर ठेऊन दरवर्षी महाराष्ट्र शासनामार्फत महा आवास अभियान - ग्रामीण हा उपक्रम राबविण्यात येतो.

सदर उपक्रमातील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था/ व्यक्तींना पुरस्कार दिले जातात. या अभियानामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये मालवण तालुक्यात खरारे - पेंडूर या ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या पुरस्काराचा वितरण समारंभ कुडाळ मालवण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल सभागृह, पोईप येथे पार पडला. यावेळी गटविकास अधिकारी शाम चव्हाण, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह अन्य पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.

आमदार निलेश राणे यांनी पुरस्कार देत सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी सरपंच नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, ग्रामपंचायत अधिकारी कोठावळे मॅडम, ग्रा. सदस्य अश्विनी पेडणेकर, अंकिता सावंत, वैष्णवी लाड, कर्मचारी अनिल पाटील, हृषीकेश लाड आदी उपस्थित होते.

rapan bottom