नांदोस गावात खळबळ
मालवण: मालवण तालुक्यातील नांदोस या गावात जंगलमय भागात पुरुष जातीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची मोठ्या प्रमाणात वाताहात झालेली दिसून येत आहे. हाडेच शिल्लक आहेत. माहीती समजताच गावातील नागरिकांनी याबाबत मालवण पोलिसांना खबर दिली. मालवण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

