Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

लँडिंग करताना कोरजाईच्या जंगलात विमान कोसळले..... 

लँडिंग करताना कोरजाईच्या जंगलात विमान कोसळले..... 

आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम

१३१ अधिकारी-अम्मलदारांचा सहभाग

निलेश जोशी | कुडाळ : अलीकडेच अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली आज चिपी विमानतळावर आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास आपत्ती निवारण यंत्रणा किती अलर्ट आहे याची चाचपणी करण्यात आली.  चिपी विमानतळावर उतरणारे विमान कोरजाईच्या जंगलात कोसळले आहे अशी परिस्थिती निर्माण केलेल्या या मॉकड्रिल अर्थात रंगीत तालीम मध्ये चिपी विमानतळाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह विविध विभागांचे १३१ जण सहभागी झाले होते. सकाळी ११.१३ ते दुपारी १.३६ वाजेपर्यंत हि मोहीम राबविण्यात आली.
    चिपी विमानतळाजवळ कोरजाई तिठा शेजारच्या  जंगलात सकाळी ११.१३ वाजण्याच्या सुमाराला विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचा मेसेज संबंधित यंत्रणांना मिळाला आणि सर्वात प्रथम चिपी विमानतळाचे  एक अधिकारी आणि ७ अंमलदार घटनास्थळी पोहोचले. त्यांनतर विमानतळ क्यू.आर.टी.चे ५ अंमलदार आणि निवती पोलीस ठाण्याचे २अधिकारी आणि ५ अंमलदार ११.३२ वाजता घटनास्थळी पोहोचले. याप्रमाणे उप विभागीय पोलीस अधीक्षक कार्यालय सावंतवाडीतून २ अधिकारी आणि चार अंमलदार, बीडीडीएस पथकाचे १ अधिकारी आणि ३ अंमलदार आणि जि वि शा चे १ कर्मचारी आणि ३ अंमलदार घटनास्थळी पोहोचले.
      मालवण पोलीस ठाण्याचे प्रत्येकी १ अधिकारी आणि ५ अंमलदार मालवण तिठा आणि मालवण हॉस्पिटल येथे थांबले. कुडाळ पोलीस ठाण्याचे १  अधिकारी आणि ५ अंमलदार कारली तिठा येथे तर १ अधिकारी आणि ५ अंमलदार येसुआक्का तिठा येथे थांबले. जिल्हा वाहतूक शाखेचे ४ अंमलदार कोरजाई तिठा येथे, परुळेबाजार येथे एक अधिकारी आणि चार अंमलदार, महाराष्ट्र बँक येथे ४ अंमलदार, गेट नंबर ९ येथे २ अंमलदार थांबले. ओरोस येथील एक अधिकारी आणि पाच अंमलदार यांनी विमानतळाच्या मुख्य गेटचा ताबा घेतला.  सावंतवाडीचे प्रत्येकी १ अधिकारी आणि ५ अंमलदार अनुक्रमे परुळेबाजार आणि विमानतळ आणि मेन गेट कडे थांबले. बांदा पोलीस  ठाण्याचे १ अधिकारी आणि ५ अंमलदार आणि आरसीपीचे ३४ अंमलदार घटनास्थळावर राखीव तैनात ठेंवण्यात आले होते. दुपारी १२ वाजून २३ मिनिटांपर्यंत या सर्व पथकांनी आपापल्या पोझिशन घेतल्या होत्या.
  या रंगीत तालीम मध्ये रुग्णवाहिका, दोन अग्निशमन बंब आणि इतर यंत्रणा देखील सहभागी झाले होते. दुपारी १ वाजून १६ मिनिटांपर्यंत हि रंगीत तलम सुरु होती.

rapan bottom