Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

शोध व बचाव पथकांना आपत्ती व्यवस्थापन साहित्याचे वितरण

शोध व बचाव पथकांना आपत्ती व्यवस्थापन साहित्याचे वितरण

चांदा ते बांदा योजनेअंतर्गत वाटप

अत्याधुनिक साहित्यामुळे होणार मदत

आंबोली व सांगेलीतील बचाव पथकाचा सत्कार

सिंधुदुर्गनगरी : आपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करणे, ज्यामध्ये तात्काळ प्रतिसादाला अत्यंत महत्व आहे. चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शोध व बचाव पथकांना अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन साहित्य मिळाल्यामुळे ते अधिक प्रभावीपणे कार्य करु शकणार असल्याचे 'सिंधुरत्न' योजनेचे अध्यक्ष आमदार दिपक केसरकर म्हणाले.

चांदा ते बांदा योजनेअंतर्गत आंबोली व सांगेली येथील शोध व बचाव पथकाकरिता साहित्य वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे प्रमुख आर.जे. यादव, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती सामंत तसेच आंबोली व सांगेलीतील स्थानिक बचाव पथकातील सदस्य उपस्थित होते.

श्री केसरकर पुढे म्हणाले की, आंबोली परिसरातील नागरिक आपत्तीच्या वेळी मदतीला धावतात. आपत्ती काळात प्राण वाचविण्याचे त्यांचे कार्य अनेक वर्षांपासून सुरू आहे. बचाव पथकाला अत्याधुनिक साहित्य मिळाल्यामुळे त्यांचे कार्य अधिक सुलभ होणार आहे. या साहित्यामध्ये एक चार चाकी वाहन, ड्रोन कॅमेरा, अंडर वाटर कॅमेरा, वॉकी टॉकी असे साहित्यांचा समावेश आहे असेही ते म्हणाले.

श्री दळवी म्हणाले चांदा ते बांदा आणि सिंधुरत्न योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकरी, महिला आणि तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या योजनेअंतर्गत अत्याधुनिक साहित्याचे वाटप झाल्याने अनेक जीव वाचणार आहेत असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री सुकटे यांनी या साहित्यामुळे बचाव पथकाला कशा प्रकारे मदत होणार आहे हे सांगितले. आपल्या जिल्ह्यातील स्थानिक बचाव पथकाला आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे आंबोली व सांगेली येथील पथक या कार्यात निष्णांत आहे. या साहित्यामुळे आता ते अधिक प्रभावीपणे काम करु शकणार असल्याचेही ते म्हणाले.

rapan bottom