Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

झाराप मध्ये अवैध वाळू साठ्यावर महसूल विभागाची कारवाई

झाराप मध्ये अवैध वाळू साठ्यावर महसूल विभागाची कारवाई

अवैधरित्या आढळला २१० ब्रास वाळूसाठा

निलेश जोशी | कुडाळ : महसूल विभागाच्या पथकाने कुडाळ तालुक्यातील झाराप - मुस्लिमवाडी येथे छापा टाकून बिगर परवाना अवैध असा २१० ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे. कुडाळचे निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी रात्री ८ वा. ही कारवाई केली. याबाबत चौकशी केली असता, हा वाळू साठा इर्शाद मुजावर (रा. झाराप खानमोहल्ला ) याची असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. संबंधितावर नोटीस बजावणी करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी दिली.
झाराप - मुस्लिमवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा असल्याची तक्रार कुडाळ महसूल विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी उशिरा कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार जाधव पथकासह त्या परिसरात दाखल झाले. या पथकात जाधव यांच्यासोबत मंडळ अधिकारी जांभवडेकर, झाराप तलाठी निलेश कांबळे, झाराप पोलीस पाटील, हुमरस पोलीस पाटील, झाराप कोतवाल पौर्णिमा कुडाळकर यांचा समावेश होता.
. झाराप - मुस्लिमवाडी परिसरात वाळूचा साठा असल्याचा शोध घेत असताना तेथे वाळूचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनाला आले. त्याच परिसरात सहा ठिकाणी वाळूचे साठे आढळले. या भागात तपासणी केल्यावर सुमारे २१० ब्रास अववैध वाळू साठा आढळून आला. यावेळी फथकाने पंचनामा करून वाळू जप्त करण्यात आली. हा वाळूसाठा इर्शाद मुजावर याचा असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. संबंधिताचा जबाब घेण्यात आला.
दरम्यान, तहसीलदार वीरसिंग वसावे याच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने हि कारवाई केली. विनापरवाना अनधिकृत वाळूचा साठा झाराप मुस्लिमवाडी भागात आढळला. याप्रकरणी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे निवासी नायब तहसीलदार जाधव यांनी सांगितले.
सध्या कर्ली खाडीपात्रातील अधिकृत वाळू उत्खनन बंद आहे. मात्र, अनधिकृत वाळू उपसा करून काही भागात वाळूचा साठा वाळूमाफियामार्फत केला जातो. छुप्या पद्धतीने केलेला हा साठा नंतर चोरट्या पद्धतीने विकला जातो. झाराप येथील या कारवाईंमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. सध्या अधिकृत वाळू उत्खनन बंद आहे. काही भागात पूर्वीचे अनधिकृत वाळू साठे असण्याची शक्यता आहे. कुडाळ महसूल पथकाने यापुर्वी काहीवेळा अशाप्रकारचे वाळू साठ्यावर कारवाई करत जप्त केले आहेत.

rapan bottom