Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह मालवण येथे 2025 - 26 करिता मोफत प्रवेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह मालवण येथे 2025 - 26 करिता मोफत प्रवेश


मालवण : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग नियंत्रणाखालील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला मुलींचे शासकीय व वसतीगृह मालवण येथे सन 2025 - 26 करिता मोफत प्रवेश देणे सुरू आहे.
वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट सुसज्ज आणि प्रशस्त इमारत, निवासाची प्रशस्त अशी व्यवस्था, उत्कृष्ट भोजन व्यवस्था, शैक्षणिक साहित्य, सुसज्ज ग्रंथालय, वाचनासाठी नियमित पाच वृत्तपत्रे, इंटरनेट व वाय-फाय सह अद्यावत संगणक कक्ष, मनोरंजनाकरिता दूरदर्शन संच, खेळ साहित्य ग्रीन जिम साहित्य, निर्वाह भत्ता प्रतिमाह रुपये 500/-, स्वच्छता भत्ता प्रतिमा रुपये 100/- (मुलींकरिता), स्टेशनरी करिता प्रति वर्ष रुपये 4000/- (महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता), छत्री गम बूट करिता प्रतिवर्ष रुपये 500/-, गणवेश करिता प्रति वर्ष रुपये 1000/-( विद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता)
प्रति वर्ष दोन हजार रुपये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता दिनांक 26 जुलै 2011 च्या शासन निर्णयानुसार नमूद प्रमाणे सोयी सुविधा पुरविण्यात येतात. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांनी आपला वसतिगृहप्रवेश ऑनलाईन पद्धतीने निश्चित करावा. hmas.mahait.org ऑनलाइन प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे - जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, शाळा महाविद्यालय सोडल्याचा दाखला, मागील वर्षाचे गुणपत्रक, बोनाफाईड किंवा शाळा प्रवेश निश्चितीची पावती, रहिवासी दाखला, आधार कार्ड.
प्रवेशाकरिता संपर्क - माननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सिंधुदुर्ग तसेच गृहपाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह मालवण, मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह वायरी भूतनाथ तालुका मालवण, जिल्हा. सिंधुदुर्ग.

rapan bottom