Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

धाराशिव येथे दि.१९ व २० जुलै रोजी ग्राहक पंचायतचे राज्य अधिवेशन

धाराशिव येथे दि.१९ व २० जुलै रोजी ग्राहक पंचायतचे राज्य अधिवेशन

कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे : राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड

वैभववाडी: ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे २०२५ चे राज्यस्तरीय अधिवेशन दि.१९ व २० जुलै रोजी धाराशिव येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या तयारीसाठी धाराशिव येथे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली तयारी आढावा बैठक पार पडली. धाराशिव येथील बीड-सोलापूर बायपास मार्गावर असलेल्या गणेश मंगल कार्यालयात ही बैठक संपन्न झाली.
या बैठकीत आगामी अधिवेशनाच्या नियोजनासह व्यवस्थेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी राज्य संघटक सर्जेराव जाधव, राज्य सहसंघटक मेधाताई कुलकर्णी, मराठवाडा विभाग संघटक हेमंत वडने, जिल्हाध्यक्ष अजित बागडे, लातूर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद तिवारी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कांबळे, जिल्हा सचिव आशिष बाबर, संघटक रवी पिसे, सहसंघटक विशाल शिंदे, शरद वडगावकर यांच्यासह राज्याचे व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
या अधिवेशनात शासकीय अधिकारी, विविध विषय तज्ञ मंडळी विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनात विभागनिहाय दिला जाणारा शेतकरी, उद्योजक व्यापारी, श्रमिक व ग्राहक हा पंचप्राण पुरस्कार व उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. तरी राज्यातील जास्तीत जास्त सदस्य व कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी असे आवाहन संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड,संघटक सर्जेराव जाधव व सचिव श्री.अरुण वाघमारे यांनी केले आहे.

rapan bottom