Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

जलक्रीडा व्यावसायिकांच्या पाठीशी : पालकमंत्री नितेश राणे

जलक्रीडा व्यावसायिकांच्या पाठीशी : पालकमंत्री नितेश राणे

जलक्रीडा व्यवसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक होणार

राज्य सरकार कडून आवश्यक ते सहकार्य मिळवून देण्याची मंत्री नितेश राणे यांची ग्वाही

भाजप तालुका अध्यक्ष विष्णू मोंडकर यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा केंद्र व राज्य सरकारने जाहीर केला असून देशविदेशातुन दरवर्षी दहा लाखापेक्षा जास्त पर्यटक जलक्रीडा पर्यटनासाठी मालवण दांडी चिवला बीच ,तारकर्ली,देवबाग ,भोगवे समुद्रकीनारी तसेच कर्ली खाडी याभागात स्कुबा डायव्हिंग,जलक्रीडा पर्यटनाचा आस्वाद घेतात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलक्रीडा व्यवसाय हा जिल्ह्यातील स्थानिकांनी कुठल्याही शासकीय अनुदाना शिवाय चालू केला असून स्कुबा डायव्हिंग ,कयाक रायडिंग,डॉल्फिन सफर,जेटस्की,स्पिड बोट,बनाना,बम्पर,पॅरॅसिलिंग रायडिंग सेवेच्या माध्यमातून उत्कृष्ट सेवा देऊन विशेषतः मालवण तालुका देशविदेश स्तरावर पोचला आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यवसायिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जलक्रीडा व्यवसायिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी नितेशजी राणे पालकमंत्री सिंधुदुर्ग ,मत्स्य व्यवसाय ,बंदरे विकास मंत्री महाराष्ट्र राज्य. यांची पर्यटन व्यावसायिक महासंघ,तारकर्ली पर्यटन विकास संस्था पदाधिकारी तसेच जलक्रीडा व्यासायिकांच्या वतीने भाजपा मालवण तालुका अध्यक्ष विष्णू मोंडकर यांच्या मार्फत भेट घेण्यात आली.

यावेळी जलक्रीडा व्यवसायाबाबत समस्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये दरवर्षी २५ मे ला शासन जलक्रीडा व्यवसाय बंदी कालावधी सुरु करते त्यांची मुदत वातावरणाचा अंदाज घेऊन बंदी कालावधी १० जून पर्यंत वाढविणे गरजेचे आहे नदी ,खाडी,तलाव क्षेत्रात जलक्रीडा प्रकल्प साठी पावसाळी वादळी वातावरण वगळता बारमाही परवानगी आवश्यक आहे, दरवर्षी नौका सर्वे होऊन नौका फिटनेस सर्टिफिकेट मिळण्यासाठी वर्षभराचा कालावधी होऊनही नौका फिटनेस सर्टिफिकेट मिळत नाही त्यासाठी तालुका स्तरावर पर्यटन हंगाम सुरु होताना नौका फिटनेस कॅम्प आयोजित करून जलक्रीडा व्यावसायिकांना नौका फिटनेस दाखला देण्यात यावा, तसेच सदर दाखला देणारा अधिकारी मुंबई येथे नियुक्त असल्याने जल पर्यटन हंगाम चालू होताना त्यांची नियुक्ती जिल्हा स्तरावर करण्यात यावी, स्कुबा डायव्हिंग साठी अधिकृत परवानगी द्यावी, जलपर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी स्थानिक जलपर्यटन व्यावसायिक व राज्य सरकार यांच्या समन्वयाने व्यावसायिक पॉलिसी बनवावी, जलक्रीडा परवानगी पर्यटन संचालन व बंदरे विभाग यांच्या समन्वयाने एक खिडकी पद्धतीने जिल्हास्तरावर देण्यात यावी,जलक्रीडेसाठी किनारपट्टीवर डोअरस्टेप वाहनाद्वारे पेट्रोल पुरविण्याची पॉलिसी बनवावी, सुनामी आयलंड पुनर्स्थापित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात यावी, कोळंब खाडी तसेच हॉटेल सायबा समोरील पसरिसारातील गाळ काढून जलपर्यटन प्रकल्पासाठी परिसर विकसित करावा, आडारी गणेश मंदिर समोरील परिसर खाडीतील गाळ काढून मँग्रोज सफर जलक्रीडा प्रकल्पासाठी विकसित करण्यात यावा, अधिकृत परवानगी धारक जलक्रीडा व्यवसायिकांच्या बुकींग , मार्केटींग साठी पर्यटन संचानालय व मेरीटाईम बोर्ड यांनी एकत्र वेब पोर्टल सुरु करावे जेणेकरून व्यावसायिक सुसूत्रता येऊन शासनास महसूल वाढ होईल ह्या मुद्यावर चर्चा करण्यात आली.

यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी जलक्रीडा व्यवसायिकासोबत मी असून राज्यसरकार कडून आवश्यक ती मदत जलक्रीडा व्यावसायिकांना करणार लवकरच संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाची मिटींग मंत्रालय मुंबई येथे स्थानिक जलक्रीडा व्यवसायीक या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांच्या सोबत घेऊन जलक्रीडा व्यावसायिकांच्या समस्या दूर करण्यात येतील असे सांगितले अशी माहिती विष्णू मोंडकर भाजपा तालुका अध्यक्ष यांनी दिली

यावेळी , कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे , तारकर्ली पर्यटन संस्था अध्यक्ष सहदेव साळगावकर, पर्यटन महासंघ जलक्रीडा अध्यक्ष मनोज खोबरेकर, रामा चोपडेकर , मनोज मेथर, कन्हया तांडेल, अन्वेषा आचरेकर आदी जलपर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

rapan bottom