Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन

सिंधुदुर्ग : देशात १९७५ साली लागू झालेल्या आणीबाणीला आज २५ जून रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून देशात सन 1975 ते 1977 मध्ये लावलेल्या आणीबाणीतील घडामोडींवर आधारित सचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, आरती देसाई, शारदा पोवार, संघर्षयात्री गजानन पणशीकर, नवनगर विकास प्राधिकरणाचे सदस्य प्रभाकर सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष लवू म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.

देशात १९७५ साली लागू झालेल्या आणीबाणीला आज २५ जून रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. १९७५ ते १९७७ या दरम्यान लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि मूल्यांच्या जपवणुकीसाठी अत्यंत कठोर परिस्थितीत अनेक जणांनी योगदान दिलं. या लढ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांचा सहभाग महत्वपूर्ण आहे. आणीबाणीच्या या लढ्यात संघर्षयात्रींनी सामाजिक आणि राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेला होता त्यांचे हे कार्य सदैव स्मरणात राहण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे प्रदर्शन २७ जून पर्यंत नागरीकांना बघण्यासाठी उपलब्ध असणार आहे. या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी केले आहे.

rapan bottom