मालवण शहर मडयेवाडा येथील नागरिकांनी दत्ता सामंत यांच्याशी साधला संवाद
विविध विकास कामांबाबत सकारात्मक चर्चा
मालवण : मालवण शहर मडयेवाडा येथील नागरिकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची भेट घेतली. यावेळी विविध विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
दरम्यान, आमदार निलेश राणे मतदारसंघाच्या विकासासाठी कटीबद्ध आहेत. सर्वच ठिकाणी गतिमान विकास होत आहे. आपलीही विकासकामे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पुर्ण केली जातील. असा विश्वास दत्ता सामंत यांनी उपस्थित नागरिकांना दिला.
नागरिकांच्या मागणीनुसार महेश सारंग यांच्या पुढाकारातून दत्ता सामंत यांनी मडयेवाडा येथे येत नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख दिपक पाटकर, महेश सारंग, राजू बिडये यांसह मालवण शहर मडयेवाडा येथील सदानंद मडये, सचिन मडये, समीर मडये, संदीप मडये, सिद्धेश मडये, सागर मडये, आकाश मडये, महेश मडये, लतेश मडये, संतोष मडये, सुनील मडये, विलास मडये, अनंत मडये, लिलाधर मडये, प्रणव मडये, कविता मडये, स्मिता मडये, सुनिती मडये, संगीता मडये, सुवर्णा मडये, दुर्गा मडये, मयुरी मडये, सरिता मडये, शमिका मडये, शुभांगी मडये, सिया मडये, संतोषी मडये , जयश्री मडये, लतिका मडये, तन्वी मडये , रसिका मडये, वनिता मडये, चंद्रशेखर मडये, धनश्री मडये , कीर्तिमाला मडये, गौरव सारंग , रघुनाथ सारंग, रश्मी सारंग , प्रथमेश टेमकर, सुगंधा टेमकर , प्रणय माळकर, प्रवीण माळकर, ओंकार बांदकर, दिपक बांदकर, संकेत बांदकर, सोनोजी तोडणकर, साक्षी तोडणकर , शशिकांत पाटकर, सुचिता पाटकर , हेमंत किनळेकर, निनाद किनळेकर, भारती तळेकर, मीनल तळेकर, नंदा सरमळकर , गणेश परब , प्रतीक परब, रामचंद्र शिंदे , राजा मांजरेकर, आनंद हडकर, प्रवीण हडकर, उमेश हडकर, बाळा जाधव यांसह अन्य नागरिक उपस्थित होते. दत्ता सामंत यांचा सत्कार नागरिकांच्या वतीने करण्यात आला.

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सर्व विकासकामे पुर्ण करणार : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत
