Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

टोपीवाला हायस्कूल येथे डास नियंत्रण जनजागृती

टोपीवाला हायस्कूल येथे डास नियंत्रण जनजागृती

डास प्रतिबंधासाठी ग्रामीण रुग्णालयाचे महत्त्वाचे आवाहन

हिवताप, डेंग्यू, चिकनगुनियासाठी मोफत तपासणी व उपचार

मालवण | प्रतिनिधी : हत्तीरोग विभागाचे कर्मचारी श्री एस ए चांदोस्कर यांनी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत टोपीवाला हायस्कूल मुलांना डासाचे जीवनचक्र,अंडी अळी,कोष या पाण्यातील व त्यानंतर प्रौढ अवस्थेत हवेमध्ये कसे पूर्ण होते या विषयी विध्यार्थीना माहिती दिली.
तसेच जैविक उपाययोजनेअतर्गत गप्पी मासे हे डासांच्या अळ्या एकावेळी 50 ते 60 वेळा खाऊन टाकतात. हे मासे डबक्यामध्ये किंवा पडक्या विहिरीमध्ये सोडावेत जेणेकरून डासांची पैदास कमी होईल. गप्पी मासे मालवण ग्रामीण रुग्णालयात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.
तसेच हिवताप विभागामार्फत अळीनाशक औषध उपलब्ध आहे. हे औषध पिण्याचे पाणी सोडून गटारे सांडपाणी याठिकाणी टाकले जाते. त्यामुळे डासांच्या अळ्या नष्ट होतात.
हिवताप डेंग्यू चिकनगुनिया आजाराची लक्षणें तपासणी व उपचार ग्रामीण रुग्णालय येथे मोफत केली जाते. रुग्णांनी कोणताही ताप अंगावर नकाढता रक्ताची तपासणी करून मोफत औषधीपचार केले जातात. रुग्णालय मार्फत मालवण तालुक्यात शहर परिसरात रात्री 8 ते 12 या वेळेत हत्तीरोग रक्तनमुने संकलित केले जातात.
तरी मुलांनी कोरडा दिवस पाळावा आपल्या परिसरातील डबके टायर्स करावंट्या यांची योग्य विल्हेवाट लावावी आणि रोगराई टाळावी असे आवाहन मालवण ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी वैद्यकिय अधिक्षक डॉ संजय पोळ श्री व्ही पी सावंत आरोग्य निरीक्षक श्री एस ए चांदोस्कर आरोग्य कर्मचारी हत्तीरोग रात्रचिकित्सालय मालवण श्री आर बी साखरे क्षेत्र कर्मचारी उपस्थित होते.

rapan bottom