Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

वाहून गेलेल्या अमित धुरीचा मृतदेह सापडला

वाहून गेलेल्या अमित धुरीचा मृतदेह सापडला

घटनास्थळापासून २ किमी अंतरावर कपारीत आढळला मृतदेह

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ तालुक्यात माणगांव खोऱ्यातील कर्ली नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वसोली सतयेवाडी येथील कुत्रेकोंड कॉजवेवर अमित मोहन धुरी (३०, रा. .माणगांव धरणवाडी) वाहून गेला होता. त्याचा मृतदेह काॅजवे पासून दोन किलोमीटर अंतरावर वसोली येथील महात्मा राय या ठिकाणी नदीपात्रात सापडला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह नदी पात्रातील पाण्यातून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
माणगांव धरणवाडी येथील अमित धुरी व माणगाव डोबेवाडी येथील सखाराम कानडे हे दोघेही वसोली सतयेवाडी येथे जात असताना सोमवारी रात्री ८ वा.च्या सुमारास स्प्लेंडर मोटरसायकलसह पुराच्या पाण्यात वाहून गेले.सुदैवाने सखाराम कानडे यांना झाडाचा आधार मिळाला व ते बाहेर आल्याने बचावले.या घटनेची माहिती मिळताच सोमवारी रात्रीच कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे, कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी भेट दिली होती. मंगळवारी  सकाळी एनडीआरएफ पथकासह प्रशासनाने नागरीकांच्या सहकार्याने घटनास्थळी कर्ली नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली मात्र सायंकाळी उशिरापर्यंत अमितचा कुठेच थांगपत्ता न लागल्याने शोधमोहीम आटोपती घेतली होती.
आज बुधवारी पुन्हा स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेण्यात आली. यावेळी काॅजवेपासुन दोन किमी अंतरावर अमितचा मृतदेह दगडाच्या कपारीत झाडांमध्ये अडकून पडलेला स्थानिक नागरीकांच्या निदर्शनास आला. याची माहिती माणगांव पोलिस दुरक्षेत्रचे हे काॅ.सखाराम भोई यांना देण्यात आली; त्यांनी मृतदेहाची खात्री केली व स्वतः पाण्यात उतरून मनोहर गुंजाळ, बापू बागवे व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.
या शोध मोहीमेत वसोली सरपंच अजित परब,तलाठी अनिल राणे,पोलीस काॅस्टेबल आनंद पालव, प्रकाश कदम, कृष्णा सावंत, राजेंद्र परब, दिपक वारंग आदी सहभागी झाले होते. तसेच परिसरातील पोलिस पाटील यानींही सहभाग घेतला होता. कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी येऊन माहीती घेतली व मृतदेह शवविच्छेदनासाठी माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी माणगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला.शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.सायंकाळी माणगांव धरणवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अमितच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अमितच्या अकाली व अपघाती जाण्याने धुरी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.आई-वडील व भावंडांचा आक्रोश ह्दय पिळवटून टाकणारा होता.अमितच्या पश्चात आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.

rapan bottom