Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

गटाराचे काम रस्त्याच्या मध्यापासून ११ मीटरवर

गटाराचे काम रस्त्याच्या मध्यापासून ११ मीटरवर

कुडाळ नगर अभियंता यांनी केले स्पष्ट

काम रोखल्याच्या पार्श्वभूमीवर न.प. च्या भूमिकेची होती उत्सुकता

निलेश जोशी | कुडाळ : शहारत नगर पंचायत कडून मुख्य रस्त्याच्या बाजूला जे कॉंक्रिट गटार बांधकाम होत आहे, ते नियमानुसार आणि रस्त्याच्या मध्यापासून ११ मीटर वर होत असल्याची माहिती नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर आणि नगर पंचायतच्या नगर अभियंता सोनाली हळदणकर यांनी दिली. शहरातील जिजामाता चौकात या गटार बांधकामाला अलीकडे काही व्यावसायिकांनी विरोध केला होता, त्या पार्श्वभूमीवर नगर पंचायत नेमकी कोणती भूमिका घेणार या विषयी उत्सुकता होती. पण आता मंगळवार पासून हे काम सुरु करण्यात आले आहे.
कुडाळ शहारत नगर पंचायत मार्फत मुख्य रस्त्यावरील पोलीस ठाणे ते जिजामाता चौक दरम्यान एका बाजूला कॉंक्रिट गटाराचे काम सुरु आहे.त्यामुळे साईडपट्टीची रुंदी बऱ्यापैकी वाढली आहे. पोस्ट कार्यालयापासून जिजामाता चौक येथे सध्या हे काम सुरु असून शनिवारी कॉंक्रिट गटाच्या बांधकामाला जिजामाता चौकातील काही व्यावसायिकांनी विरोध केला. पण शनिवार रविवार सुट्टी असल्याने याबाबत नगर पंचायतची भूमिका समजू शकली नव्हती. या संदर्भात नागराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर आणि नगर अभियंता सोनाली हळदणकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी याबाबत नगर पंचायतीची भूमिका स्पष्ट केली.
नगर अभियंता सोनाली हळदणकर यांनी सांगितले, हे एकूण ३५० मीटर लांबीचे कॉंक्रिट गटार बांधकाम आहे. मुख्य रस्त्याची रुंदी २४ मीटर आहे त्यामुळे रस्त्याच्या मध्यापासून ११ मीटरवर गटार बांधकाम होईल. उरलेला एक मीटरचा भाग हा भविष्यातील पाणी, गॅस, वगैरेंच्या पाईपलाईन, सुशोभीकरण वगैरेसाठी राखीव ठेवलेला आहे. सगळीकडे रस्त्याच्या मध्यापासून ११ मीटर वर गटार बांधकाम सुरु असल्याचे श्रीमती हळदणकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान मुख्य रस्त्याच्या पलीकडच्या बाजूच्या गटाराचे काम गणेशोत्सवानंतर सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

rapan bottom