Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

आसमंत दुमदुमला…!

आसमंत दुमदुमला…!

'स्वराज्य' ढोल ताशा पथक वाद्यपूजन सोहळा व वादकांचा मेळावा मोठया उत्साहात संपन्न

समाजकार्यात सक्रियपणे कार्यरत असणाऱ्या व्यक्तिमत्वांचा तसेच पारंपरिक वादकांचा झाला सन्मान

जुबेर खान | मालवण : मालवण येथील स्वराज्य ढोल ताशा पथकातर्फे वाद्यपूजन सोहळा व वादकांचा मेळावा मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे संपन्न झाला. यावेळी मालवण मधील विविध वाद्य प्रकारातील वादकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ५५ ढोल व १५ ताशांच्या साहाय्याने ढोल- ताशा वादकांनी नाट्यगृह परिसरात केलेल्या वादनाने आसमंत दुमदुमून गेला.

कल्लोळ उत्सवांचा नाद स्वराज्याचा अशी गर्जना करत वाद्यपूजन सोहळा व वादकांच्या मेळाव्याचे आयोजन "स्वराज्य" ढोलताशा पथक मालवण यांच्या वतीने करण्यात आले. समाजकार्यात सक्रियपणे कार्यरत असणाऱ्या रक्तदान क्षेत्रातील रक्तदात्यांचा, प्राणीप्रेमी तसेच स्वराज्याचे वादक जे आता ते शासकीय व अन्य ठिकाणी सेवाकार्य करत आहेत या सर्वांचा सन्मान, वाद्य पूजन असा भरगच्च कार्यक्रम 'स्वराज्य' संस्थापक सौ. शिल्पा यतीन खोत यांच्या संकल्पनेतून करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वराज्य ढोल ताशा पथकाच्या सर्वेसर्वा व सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत व माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या हस्ते आणि आचरा येथील मंदार सरजोशी यांच्या पौरोहित्याखाली वाद्यपूजन करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुणे मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यापीठावर भजनसम्राट भालचंद्र केळूसकर, वादक व सामाजिक कार्यकर्ते सदा चुरी, सौ. चारुशीला आढाव, स्वराज्य ढोल पथक कोल्हापूरचे स्वप्नील चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांचा स्वराज्य ढोल ताशा पथकातर्फे शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सुधीर गोसावी (तबला), वैभव मांजरेकर (ढोलक ढोलकी), प्रफुल्ल गोसावी (हार्मोनियम), अक्षय सातार्डेकर (हार्मोनिअम), प्रभुदास आजागावकर (पखवाज), निलेश गवंडी (हार्मोनियम), मंगेश कदम (हार्मोनियम), महेश तळवडेकर (हार्मोनियम), विजय बोवलेकर (हार्मोनियम), विनोद सातार्डेकर (पखवाज), हर्षद खराडे (ऑकटोपॅड), सर्वेष परुळेकर (गिटार), स्वप्नील केळुसकर (हार्मोनियम), विशाल केळूसकर (पखवाज), मिलिंद हडकर (बासरी व तबला), पारंपारिक वाद्य वादक दिपक‌ मालवणकर, सुरेश मालवणकर, दिनकर मालवणकर, चंद्रकांत मालवणकर, श्री. मालवणकर तसेच स्वराज्य ढोल पथकातील ढोल वादक अमन व श्रीकांत, सिनिअर वादक ऍड. सायली आचरेकर यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर सर्व ढोल ताशा वादकांच्या वतीने सौ. शिल्पा खोत यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

तसेच अलीकडेच मालवणात सादर झालेल्या शिवराज भूषण या महानाट्याचे निर्माते भूषण साटम, दिग्दर्शक गणेश मेस्त्री, भाऊ सामंत, तसेच नितीन तोडणकर, नगरपालिकेचे नाट्यगृह व्यवस्थापक सुभाष कुमठेकर, सर्पमित्र आनंद बांबर्डेकर, सर्पमित्र स्वप्नील परुळेकर, सर्पमित्र अक्षय राजपूत यांचाही सन्मान करण्यात आला. तर स्वराज्य ढोल पथकातील वादक महेश वालीकर याला दहावीच्या शिक्षणासाठी उद्योजक सागर वाडकर यांच्याकडून देण्यात आलेली आर्थिक मदत यावेळी सुपूर्द करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व भजनसम्राट भालचंद्र केळूसकर यांनी मनोगते व्यक्त करत स्वराज्य ढोल पथकाच्या कार्याचे कौतुक केले. सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले. यावेळी यतीन खोत, मंदार सरजोशी, सौ. मिताली कोरगावकर, प्रा. डॉ. एम. आर. खोत, संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, लायन्स क्लबच्या अनुष्का चव्हाण, मनाली दळवी, अंजली आचरेकर, नंदिनी गांवकर, मालवण व आचरा येथील स्वराज्य ढोल पथकाचे सदस्य, यशराज प्रेरणा ग्रुपचे सदस्य व इतर नागरिक उपस्थित होते.

https://youtu.be/v1i-x2cPBLI

rapan bottom