आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या सहकार्यातून रस्ता काम पुर्ण : ग्रामस्थानीही केले श्रमदान
मालवण | प्रतिनिधी : गोळवण गावातील धवडकी वाडी ते खालची गावडेवाडी, वरची गावडेवाडी या तीन वाड्यांना जोडणारा रस्ता ग्रामस्थांची अत्यावश्यक गरज ओळखून आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पुढाकातून पुर्ण करण्यात आला आहे. अनेक वर्षांची मागणी पुर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानले आहेत.
जनतेची गरज ओळखून प्राधान्याने कामे झाली पाहिजेत. एखाद्या अत्यावश्यक कामाला नियमानुसार सरकारी निधी उपलब्ध होण्यास काही वेळ लागत असेल तर ते काम स्व निधीतून करणारे नेतृत्व म्हणजे आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे आहेत.
जनतेच्या सुख दुःखात धावून जाणे, गावागावात मोठा विकासनिधी खेचून आणणे. यासाठी आमदार निलेश राणे सातत्याने प्रयत्नाशील राहून यशस्वी ठरत आहेत. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत सर्वच ठिकाणी सेवाकार्य, मदतकार्यात अग्रेसर आहेत.
गोळवण गावातही आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत याच्या सहकार्याने आणि धवडकी वाडी ते खालची गावडेवाडी, वरची गावडेवाडी या तिनही वाडीचे ग्रामस्थ याच्या श्रमदानातुन तीनही वाडीना जोडणारा रस्ता पुर्ण करण्यात आला. नेतृत्व कसे असावे हे आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्यातून जनता अनुभवत आहे. असे ग्रामस्थांनी सांगत आभार व्यक्त केला.

