Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

भाजपाकडून अपघातग्रस्त कुटूंबियांना आर्थिक मदत

भाजपाकडून अपघातग्रस्त कुटूंबियांना आर्थिक मदत

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडून आचरा येथील घाडी, गावकर, नाईक व कोळंबकर कुटुंबीयांचे सांत्वन

आचरा : नारींग्रे येथे झालेल्या रीक्षा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आचरा येथील रीक्षा व्यावसायिकांच्या घरी भेट देत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी भाजप पक्षाच्या वतीने तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 25 हजाराची मदत केली.

यावेळी त्यांच्या सोबत मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, राजन गावकर महेश मांजरेकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, संतोष गावकर, प्रकाश मेस्त्री, समिर बावकर, मंदार सा़बारी, पांडुरंग वायंगणकर,राजन पांगे, अजित आचरेकर, विजय निकम, धनंजय टेमकर, रविंद्र घागरे, मंदार सरजोशी, सिद्धार्थ कोळगे, प्रमोद वाडेकर यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.

नारींग्रे येथे झालेल्या भीषण रीक्षा अपघातात आचरा देवूळवाडी येथील संकेत सदानंद घाडी, गाऊडवाडी येथील संतोष रामजी गावकर, रोहन मोहन नाईक आणि पिरावाडी येथील सोनू कोळंबकर या तरुण युवकांचे दुःखद निधन झाले होते. यामुळे रीक्षा व्यवसायावर अवलंबून असणा-या या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.याबाबतची माहिती समजताच भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी रविवारी सायंकाळी आचरा येथे संबंधित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले. तसेच चारही कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत  देवू केली.

अपघाती विमा, नोकरी उपलब्ध करून देणार
यावेळी बोलताना भाजप अध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले की आचरा गावातील चार वेगवेगळ्या कुटुंबातील चार तरुण अपघातात गमावले आहेत.  आमच्या  भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसहित आम्ही या चारी कुटुंबीयांची भेट घेतली. या कुटूंबात त्या तरुणांची लहान मुलं आहेत ज्या मुलांना वडील गेल्याचं समजू सुद्धा शकत नाही अशी स्थिती आहे. या सर्वाना आधाराची गरज आहे. भारतीय जनता पार्टी यांच्या नेहमीच मागे उभी राहणार आहे. म्हणूनच आज त्याना तातडीची आर्थिक मदत आम्ही केलीय येणाऱ्या काळात त्यांच्या कुटुंबाला विविध सरकारी योजना मधून सवलत देण्याबरोबर अपघाती विमा रक्कम उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून अपघातात मृत झालेल्या तरुणांच्या पत्नी या शिक्षित आहेत त्याना नोकरीं उपलब्ध करून देण्यासाठी भाजप प्रयत्नशील राहणार असल्याचे भाजपा अध्यक्ष सावंत म्हणाले.

फोटो परेश सावंत
आचरा येथील कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर कुटुंबाला आधार देणार असल्याचे सांगताना   भाजप अध्यक्ष प्रभाकर सावंत व मान्यवर

rapan bottom