Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

वसोली काॅजवेवरून युवक गेला वाहून, एक सुदैवाने बचावला !

वसोली काॅजवेवरून युवक गेला वाहून, एक सुदैवाने बचावला !

युवकाचा शोध सुरू; एनडीआरएफ टीम घटनास्थळी

निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यातील माणगांव खोऱ्यातील वसोली कुत्रेकोंड कॉजवेवरून अमित धुरी नामक मोटरसायकल स्वार वाहुन गेला, तर त्यांच्या सोबत असलेला सखाराम कानडे नामक दुसरा सहकारी सुदैवाने बचावला. ही घटना सोमवारी सायंकाळी ८.३० वा.च्या सुमारास घडली. याबाबतची माहिती आपत्कालीन यंत्रणेला देण्यात आली आहे. वाहून गेलेल्या युवकाचा शोध अजून सुरू असून एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.
कुडाळ तालुक्यातील माणगांव खोऱ्यात गेला आठवडाभर कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यातच सह्याद्री पट्ट्यात काही प्रमाणात पावसाचा जोर अधिक आहे ; त्यामुळे कर्ली नदी पूर्ण क्षमतेने प्रवाहीत झाली आहे. सोमवारी सकाळपासून माणगाव खोऱ्यातील सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर काहीसा वाढला होता, त्यामुळे वसोली कुत्रेकोंड कॉजवेंवर पाणी आले होते. त्याच दरम्यान माणगांव येथून मोटरसायकलने अमित धुरी आणि सखाराम कानडे हे दोन युवक शिवापूरला जात होते. त्यांची मोटरसायकल वसोली कुत्रेकोंड येथे आली असता त्यांनी कॉजेवरील पाण्याचा अंदाज न घेता कॉजवेवरील पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला मात्र काॅजवे वरील पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे मोटरसायकल पाण्याच्या प्रवाहाने खाली खेचली गेली. त्यात अमित धुरी हा युवक पुलाच्या खाली पडला व वाहून गेला, त्याच्यासोबत बसलेला त्याचा सहकारी सुदैवाने बचावला. त्याने घटनास्थळी आरडाओरड केली मात्र रात्रीची वेळ असल्यामुळे त्याला कोणीच प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे त्याही परिस्थितीत सखाराम कानडे या सहकाऱ्याने लगत असलेल्या वसोली येथील एका दुकानावर धाव घेत झालेला घटनाक्रम ग्रामस्थांना सांगितला. त्यानंतर सर्वत्र फोनाफोनी व धावाधाव सुरू झाली आहे पण रात्रीची वेळ असल्यामुळे सर्वच यंत्रणांना मर्यादा आहेत.

तहसीलदार व पोलीस निरीक्षक रात्रीच घटनास्थळी

दरम्यान रात्री तहसीलदार विरसिंग वसावे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. या दुर्घटनेतून वाचलेल्या सखाराम कानडे याची त्यांनी भेट घेऊन घटनेची माहिती घेतली.
दरम्यान वाहून गेलेल्या अमित धुरी याचा शोध घेणे सुरू आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

rapan bottom