Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मासेमार नौकाधारकांना डिझेल प्रतिपूर्ती अनुदान मंजूर

मासेमार नौकाधारकांना डिझेल प्रतिपूर्ती अनुदान मंजूर

दोन कोटी ३६ लाखांचे अनुदान मंजूर

३०० नौका मालकांना मिळणार लाभ

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र शासनाने मासेमार नौकाधारकांसाठी डिझेल प्रतिपूर्ती योजना कार्यन्वित केलेली आहे. यामध्ये नौकाधारकांनी मच्छिमारीसाठी वापरलेल्या डिझेल वरील मूल्यवर्धित कर परतावा देण्यात येतो. १९ जूनच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० मत्स्य सहकारी संस्थांच्या नौका मालकांना २ कोटी ३६ लाख १७ हजार ५५० एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
ही रक्कम दि.२३ जून २०२५ रोजी पासून जिल्ह्यातील एकूण ३०० नौका मालकांच्या खाती VPDA प्रणाली अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येत आहे. मे २०२५ अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमार नौका धारक यांचा रु. ४ कोटी ३६ लाख ५ हजार ८१५ एवढा डिझेल परतावा प्रलंबित होता. प्रलंबित रक्कम लवकरात लवकर मंजूर करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने कळविले आहे.
पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी बंद असताना सदर परतावा अनुदान रक्कम मंजूर केल्याने मासेमार नौकाधाराकांनी शासनाचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.

rapan bottom