मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांना भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, जिप माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, पंचायत समिती माजी उप सभापती राजू परुळेकर, अरुण मेस्त्री, हिवाळे सरपंच रघुनाथ धुरी, संतोष गांवकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री नितेश राणे यांना भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
