Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

'सुवर्णगड' कोकण विकासाचा..!

'सुवर्णगड' कोकण विकासाचा..!
  • कार्यसम्राट कर्तृत्ववान नेतृत्व…
  • सिंधुदुर्गचे पालक नामदार नितेशजी नारायणराव राणे

आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा ठळकपणे उमटवणारे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील कर्तृत्ववान नेतृत्व महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश नारायणराव राणे हे होय !

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेली तीन दशके अभ्यासु व आक्रमक नेतृत्व अशी ओळख असलेले लोक नेतृत्व अर्थातच कोकणचा बुलंद आवाज माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे साहेब हे होय. राणेंचा दबदबा राजकीय पटलावर कायमच राहिला. गेली काही वर्षे त्यांचे दोन्ही सुपुत्र वडिलांचा वारसा त्याच अभ्यासू, आक्रमक पद्धतीने पुढे नेत आहेत.

विद्यमान आमदार निलेश राणे आज मालवण कुडाळच्या जनतेच्या हृदयातील स्थान बनले आहेत. त्यांनी कार्य कर्तृत्व सिद्ध केले. यापूर्वीही खासदार म्हणून संसदेत त्यांनी आपली छाप सोडली. अभ्यासू व प्रसंगी तितक्याच आक्रमकतेने त्यांनी कोकणी जनतेचे प्रश्न देशाच्या सर्वोच्च सभागृहात मांडले. आज मालवण कुडाळचे आमदार म्हणून त्यांचे कर्तृत्व जनता पाहत आहे, आपल्या आक्रमक वक्तृत्व शैलीने विरोधकांना सळो की पळो करताना जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत त्यांना न्याय देण्याचे काम आमदार निलेश राणे विधिमंडळ स्तरावर करत आहेत. मंत्रालयातुन मोठा विकासनिधी खेचून आणत आहेत. ही गती अशीच राहील, वाढत राहील हे निश्चित.

याबरोबरच मंत्री नितेश राणे यांचेही कार्य कर्तृत्व शब्दात मोजणे किंवा शब्दात बांधून ठेवणे अवघडच… या माणसाच्या पायाला चाके आहेत. आणि विचारांना प्रकाशाचा वेग. विकासाची दुरदृष्टी समाजसेवे बरोबर कोणत्याही निवडणुकीत मतांच्या बेरजेचे राजकारण अगदी योग्य पद्धतीने सोडवणारा चाणक्य अशीही नितेश राणे यांची ओळख आहे. सिंधुदुर्गातील अनेक निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळत त्यांनी सिद्धही करून दाखवले आहे.

या सर्वांबरोबर नितेश राणे यांच्या अंगी असलेली सर्वोत्तम देणगी (अर्थात वडिलांकडून मिळालेली) अभ्यासू व आक्रमक वक्तृत्व शैली. विरोधकांची चिरफाड करणाऱ्या वक्तृत्वाची नेहमीच महाराष्ट्रात चर्चा होते. तर सामाजिक भान राखत केल्या जाणाऱ्या अभ्यासू वक्तृत्वाचे विधिमंडळात कौतुकही होते.

'डॅशिंग' मंत्री अशी नितेश राणे यांची ओळख आहे तशी कुटुंबप्रेमी राणे हे चित्रही अनेक वेळा दिसून आले. २०१४ च्या निवडणुकीत विजया नंतर त्यांनी वडीलाना मारलेली मिठी असो अथवा २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आई ला मारलेली मिठी असो. त्यानंतर 2024 च्या निवडणुकीत विजयाचे हे चित्र कायम राहिले. राणे कुटुंब प्रत्येकाला आपले वाटते ते या सर्वांच्या स्वभाव मुळेच.

आमदार असताना विरोधी पक्षात असताना जन आंदोलनातील नेतृत्व, मच्छिमार आंदोलनातील आक्रमकता, शांततेच्या मार्गाने झालेल्या मराठा मोर्च्यातील सहभाग… मराठा आरक्षणातील भूमिका या सर्वातून नेतृत्व गुणांची व्यपकता स्पष्ट होते. शिवभक्त आणि हिंदुत्व हे त्यांच्या रक्तात आहे. मंत्री म्हणून नितेश नारायणराव राणे यांनी कामाचा लावलेला धडाका लक्षवेधी आहे. मच्छिमारांच्या हिताचे जे आजपर्यंत झाले नाही असे अनेक निर्णय त्यांनी घेतले. मत्स्य व बंदर विभाग अग्रेसर राहिला. सोबत सिंधुदुर्ग देशातील पाहिला AI जिल्हा झाला. त्यांचे कार्य मोठे आहे आणि वाढत जाईल. सिंधुदुर्ग चा विकास 'राणे' नावाच्या राजमार्गातूनच सुरु झाला आणि यापुढे होत राहील हे निश्चित.

➖➖➖➖➖➖➖➖

rapan bottom