Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

ग्रामसभेतून गावचा विकास शक्य - महेश सावंत.

ग्रामसभेतून गावचा विकास शक्य - महेश सावंत.

गोळवण येथे आदर्श गाव ग्रामस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न-विविध कार्यक्रमांचे आयोजन.

संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील गोळवण कुमामे डिकवल येथे ग्रामपंचायत स्तरावर आयोजित होणाऱ्या ग्रामसभेला शासन स्तरावरून विशेष महत्त्व आहे. ज्या गावची ग्रामसभा लोकसंख्या निकषानुसार पूर्ण होऊन चर्चा झाल्यास होणाऱ्या ग्रामसभेतून गावचा विकास शक्य आहे असे प्रतिपादन श्री देव रामेश्वर कृषी युवा मंडळ भिरवंडे ता. कणकवली चे अध्यक्ष महेश सावंत यांनी गोळवण येथे केले.


आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजना महाराष्ट्र शासन यांच्यावतीने गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायत स्तरावर आदर्श गाव ग्रामस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम व ग्रामसभेचे महत्त्व कार्यशाळा व चर्चासूत्र गोळवण येथील श्री देव रवळनाथ मंदिरात संपन्न झाले. यावेळी गोळवण कुमामे डिकवल सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, ग्राप सदस्य साबाजी गावडे, श्रीमती प्राजक्ता चिरमुले, प्रशिक्षक अनिल गावडे, महेश सावंत, श्री देव रवळनाथ देवस्थान कमिटी अध्यक्ष मनोहर परब, आदर्श गाव योजना अध्यक्ष बाळकृष्ण खरात व गोळवण कुमामे डिकवल कार्यक्षेत्रातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री देव रामेश्वर कृषी युवा मंडळाचे अध्यक्ष महेश सावंत पुढे म्हणाले की ग्रामसभेतून गावचा विकास शासकीय असल्याने प्रत्येक गावची ग्रामसभा होण्यासाठी ग्रामपंचायतती बरोबर ग्रामस्थांनी सुद्धा सहकार्य करणे आवश्यक आहे. मार्च 2023 साली ग्रामपंचायत गोळवण कुमामे डिकवल ची निवड आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजनेसाठी झाली. गावातील 50% कामे पूर्ण झालेली असून शासन निकषानुसार 50% कामे प्रगतीपथावर आहेत.

पाणलोट प्रकल्प, बचत गट, उपजीविका उपक्रम, शेतकऱ्यांना 50% अनुदानावर उपजीविकेसाठी शेती साहित्य असे विविध उपक्रम राबविले आहे. यापूर्वी गोळवण गावात 39 महिला बचत गट कार्यरत होते, या आदर्श गाव योजनेतून बचत गटाची व्याप्ती वाढवून सध्या 57 बचत गट कार्यरत झाले आहेत. या योजनेतून 3 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी 1 कोटी रुपयांचा निधी ग्रामपंचायतला प्राप्त झाला आहे. मागील वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेसाठी करुळ गावची निवड झाली होती. यावर्षीपासून गोळवण कुमामे डिकवल गावची निवड होऊन योजनेच्या निकषानुसार सर्व कामे ग्रामपंचायत च्या माध्यमातून पूर्ण करण्यात येतील यासाठी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केल्यास महाराष्ट्रात तसेच केंद्रस्तरावर गोळवण कुमामे डिकवल गाव पुढे जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी कार्यक्रमाचे मुख्य प्रशिक्षक अनिल गावडे यांनी ग्रामसभेचे महत्त्व व अधिकार याबाबत उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच आंदुर्ले तालुका कुडाळ येथील युवा कीर्तनकार ह.भ.प. साबाजी पाटील महाराज यांनी ग्रामसभेचे महत्त्व या विषयावर कीर्तनाद्वारे प्रबोधन व मार्गदर्शन केले यावेळी नेरूर बचत गटाद्वारे महिलांच्या जनजागृती पर कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी सरपंच सुभाष लाड, ग्रामपंचायत सदस्य साबाजी गावडे, व इतर मान्यवरांनी
ग्रामसभेचे महत्त्व या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य प्रशिक्षक अनिल गावडे तर आभार गोळवण सरपंच सुभाष लाड यांनी व्यक्त केले.

rapan bottom