मालवण | प्रतिनिधी : राजकोट किल्ला, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतराच्या सभोवताली पदपथाच्या (Paving) आवश्यक दुरुस्तीसाठी व इतर अनुषंगिक कामे पुर्ण होईपर्यंत रविवार २२ जून पासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.
अशी माहिती कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्या वतीने देण्यात आली आहे.

पदपथाची आवश्यक दुरुस्ती व इतर अनुषंगिक कामे पुर्ण होईपर्यंत राजकोट किल्ला पर्यटकांसाठी काही दिवस बंद राहणार
