मालवण | प्रतिनिधी : दहावी आणि बारावी परीक्षा २०२४-२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या मालवण तालुक्यातील सर्व गाबित विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा गुणगौरव समारंभ रविवार दि. २२ जून रोजी सकाळी १० वाजता लीलांजली सभागृह, भरड- मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे.
तरी२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मालवण तालुक्यातील गाबित समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आपल्या गुणपत्रिकेच्या साक्षांकित/झेरॉक्स प्रतीसह कार्यक्रमास उपस्थित राहवे, असे आवाहन मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणी अध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर यांनी केले आहे.

