Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सिंधुदुर्ग भाजपकडून मंडलस्तरावर योग दिन साजरा

सिंधुदुर्ग भाजपकडून मंडलस्तरावर योग दिन साजरा

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत योग शिबिर

निलेश जोशी | कुडाळ : जागतिक स्तरावर आज २१ जून हा "जागतिक योग दिन साजरा होत असताना सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाने सुद्धा प्रत्येक मंडलात योग दिन सर्वसामान्य जनतेसोबत साजरा केला.
सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ एमआयडीसी येथे योग दिन शिबिर संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत २०१४ मध्ये जागतिक योग दिन प्रस्ताव मांडला , योगाचे महत्व जगाला पटवून दिले आणि २०१४ पासून २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो याचा प्रभाकर सावंत यांनी आवर्जून उल्लेख केला. योग भारतीय संस्कृतीचा बहुमोल वारसा जगभरामध्ये पोहोचविण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. व्यस्त जीवनशैलीमध्ये शरीर व मन यांना ताणतणावापासून मुक्त करण्यासाठी योगाची आवश्यकता आहे . आज संपूर्ण भारतात शासकीय कार्यालये,शाळा, विविध संस्था, योग केंद्र यांच्या माध्यमातून हा योग दिन साजरा होत असताना त्यांचे आपल्या रोजच्या जीवनात नियमित सराव करून लहान -थोर सर्वांनी निरोगी, आरोग्य संपन्न जीवन जगावे हा मोदीजींचा संदेश देशातील प्रत्येकापर्यंत पोहचावा असे आवाहन याप्रसंगी शुभेच्छा देताना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले.
या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्षां सोबत सहसंयोजक राजू राऊळ, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, प्रदेश कार्यकारीणी सदस्य सौ.संध्या तेरसे, बंड्या सावंत, युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे , महिला मोर्चा सरचिटणीस सौ.अदिती सावंत, महिला अध्यक्षा सौ.आरती पाटील , पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, सुनील बांदेकर, सौ.मुक्ती परब, गुरु देसाई इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे प्राचार्य अरुण मर्गज, दत्तप्रसाद खानोलकर, चैताली बांदेकर, प्रा. रिद्धी पाताडे व योग अभ्यासक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

rapan bottom