Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

स्मिता कम्प्युटर कट्टा इंस्टिट्यूटच्या वतीने कट्टा येथे आयोजन

चौके : आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्मिता कम्प्युटर इन्स्टिटयूट कट्टा यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन गुरामवाडी ग्रामपंचायत कट्टाचे सरपंच श्री. शेखर पेणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी स्मिता कम्प्युटर एज्युकेशनच्या संचालिका सौ. श्रद्धा नाईक मॅडम, आभाळमायाचे मार्गदर्शक श्री सुनील नाईक, श्री.परमानंद वेंगुर्लेकर गुरुजी, कट्टाचे आरोग्य सेवक श्री आदेश घाडी, आरोग्य सेविका सौ. ज्योती पाटकर,सौ. मीरा तावडे टेलिमेडीसीन आणि स्मिता कम्प्युटरच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थी उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरात कट्टा परिसरातील १०१ गरजू लोकांची रक्त तपासणी, थायरॉईड, कॅल्शियम, हिमोग्लोबीन, CBC, डायबेटिस, Thyroid function Test करण्यात आल्या. यावेळी २५ लोकांनी ECG रिपोर्ट चा लाभ घेतला. उद्घाटन प्रसंगी बोलताना सरपंच पेणकर यांनी स्मिता कम्प्युटर एज्युकेशनकडून समाजोपयोगी कार्यक्रम राबून समाजातील लोकांना, मुलांना ही तपासणी उपलब्ध करून दिल्या बद्दल समाधान व्यक्त केले आणि शुभेच्छा दिल्या.


या शिबिर प्रसंगी आभाळमाया ग्रुपचे सदस्य डॉ.श्री. प्रथमेश वालावलकर, वराड ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष श्री. छोटू ढोलम, ऍड. श्री प्रदीप मीठबावकर, श्री रामचंद्र आंबेरकर, श्री राहुल डगरे, वराडकर हायस्कूलचे श्री वाजंत्री सर,श्री भाट सर, श्री कानुरकर सर, श्री घनश्याम राणे सर, श्री शशिकांत परब सर, दिनेश राऊळ, श्री बाळा चव्हाण, श्री गौतमेश्वर नाईक, श्री उमेश मिरजकर, हरी मोरजकर, सौ. दीपिका वेंगुर्लेकर, श्रीमती प्रतीक्षा परब, सौ.कांचन ढोलम, सौ.सीमा पडते मॅडम,सौ.मोरजकर मॅडम,सौ.हंसू रावले शिवाय परिसरातील इतरही महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प आणि भेटवस्तु देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मिता कम्प्युटर आणि आभाळमायाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे आरोग्य कर्मचारी सौ. प्रगती कसालकर स्टाफ नर्स, रंजना फाटक HLL लॅब टेक्निशियन, आशा सेविका सौ. मृण्मयी ढोलम, आ मुख्य प्रवर्तक सौ. नाईक मॅडम यांचे सहाय्य लाभले. त्याच प्रमाणे स्मिता कम्प्युटरच्या आणि आभाळमायाचे रक्तदाती सविता शिरोडकर, सानिका गावडे, ओंकार वराडकर यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्य लाभले. नेहमीच आपल्या परिसरातील लोकांसाठी आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व स्तरातून स्मिता कम्प्युटरचे कौतुक होत आहे.

rapan bottom