आमदार निलेश राणे यांनीही वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून केली चर्चा
मालवण : नारिंग्रे येथील रिक्षा आणि एसटी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातत आचरा येथील मृत्यूमुखी पडलेल्या संकेत सदानंद घाडी (वय ३५, आचरा वरचीवाडी), संतोष रामजी गावकर (वय ३५, आचरा गाऊडवाडी), रोहन मोहन नाईक (वय ३५, आचरा गाऊडवाडी) आणि सोनू कोळंबकर (वय ४५, आचरा पिरावाडी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर रघुनाथ बिनसाळे हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा पर्यत त्याठिकाणी थांबून मदत कार्यात सहभागी होते. दरम्यान आमदार निलेश राणे यांनी अपघाताची माहिती देण्यात आली. त्यांनीही वैद्यकीय अधिकारी यांना संपर्क साधून चर्चा केली. यावेळी आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, संतोष कोदे, जयप्रकाश परुळेकर यांसह अन्य उपस्थित होते. घडलेल्या दुर्दैवी अपघाता बाबत दुःख व्यक्त करण्यात आले. आपण त्या सर्व कुटुंबियांच्या सोबत असल्याचा विश्वास दत्ता सामंत यांनी दिला..

