साचणाऱ्या चिखलमय पाण्यामुळे नागरिक होते त्रस्त
पाण्याचा योग्य निचरा झाल्याने नागरिकांनी व्यक्त केले समाधान
मालवण : सेवांगण चीवला बीच मार्गांवर कॉर्नरवरील सखल भागात पावसाचे पाणी सातत्याने साचून राहत होते. साचणाऱ्या पाण्यामुळे लगतचे व्यवसायिक व नागरिक यांना त्रास सहन करावा लागत होता. या पाण्यात पाला पाचोळा साचून दुर्गंधी निर्माण होत होती. आरोग्याच्या दृष्टीनेही असलेली ही समस्या लक्षात घेता स्थानिक नागरिकांनी माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांचे लक्ष वेधले. खोत यांनी तात्काळ स्व यंत्रणा तसेच मालवण नगरपरिषद कर्मचारी यांच्या माध्यमातून पाण्याचा योग्य निचरा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली. साचलेल्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला.

यतीन खोत यांच्या या कार्यतत्परतेबाबत परिसरातील नागरिकांनी आभार मानले. जॉन्सन रॉड्रिक्स, ग्रेसिस रॉड्रिक्स, मिल्टन रॉड्रिक्स, आंतोन फर्नांडिस, स्वीटन सोझ, पाउलो सोझ, कैतान सोझ, सुनील फर्नांडिस, गणपत मयेकर, मनोज मयेकर, हर्षद मयेकर यांसह अन्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

