Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योग महत्वपूर्ण - जिल्हाधिकारी अनिल पाटील

सिंधुदुर्ग : आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांतता खूप महत्वाची आहे. योगसाधनेतून मानसिक स्थैर्य लाभते. म्हणून शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी तसेच निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी सर्वांनी नियमितपणे योगसाधना करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आज येथे केले.

अकराव्या आंतरराष्ट्रीय योगदिना निमित्त आज जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा आयुष विभाग, मेरा युवा भारत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अधिष्ठाता डॉ अनंत डवंगे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ, क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा आयुष अधिकारी रुपा गावडे, 'माय भारत'च्या जिल्हा समन्वयक अपेक्षा मांजरेकर आदी उपस्थित होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, डॉन बॉस्को, न्यू इंग्लिश स्कूल ओरोस, आणि NCC चे विद्यार्थी देखील उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, सध्याच्या धावपळीच्या जिवनात सर्वांची जीवनशैली बदललेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने सकस आहार घ्यावा. पालकांनी देखील आपल्या पाल्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावे. आज प्रत्येकाला ताण-तणावाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये नियमितपणे योगा, व्यायामांचा समावेश करावा. योग हा फक्त व्यायाम नसून योगामुळे शारिरीक, मानसिक आरोग्य सुदृढ राहते. नियमित योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. योगामुळे मन:शांती तर मिळतेच शिवाय तणाव दूर होऊन एकाग्रता सुध्दा वाढण्यास मदत होते, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

यावर्षीच्या योग दिनाचे 'एक पृथ्वी, एक स्वास्थ्य के लिए योग' हे घोषवाक्य आहे. केंद्र शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या Common Yoga Protocol नुसार आयुष विभागाच्या योग शिक्षिका श्रीमती साधना गुरव यांनी प्रार्थनेने योग प्रात्यक्षिकांची सुरुवात झाली. यावेळी योग पूर्व व्यायाम प्रात्यक्षिकासह प्राणायाम, नाडी शोधन क्रिया, भ्रामरी हे योग प्रकार करुन घेण्यात आले. त्यानंतर ध्यानसाधना करण्यात आली. उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासने केली.

rapan bottom