Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

दुर्मिळ लॉगरहेड समुद्री कासवाची पारंपरिक मच्छिमारांनी घोस्ट नेटमधून केली सुटका

दुर्मिळ लॉगरहेड समुद्री कासवाची पारंपरिक मच्छिमारांनी घोस्ट नेटमधून केली सुटका

दांडी झालझुलवाडी येथे मिळाले आययूसीएन रेड लिस्ट ऑफ एन्डेंजर्ड स्पेशिज मधील लॉगरहेड समुद्री कासव

मालवण : दांडी झालझुल वाडी येथील समुद्र किनाऱ्यावर २० जून रोजी संध्याकाळी समुद्राच्या लाटांमध्ये किनाऱ्यालगत घोस्ट नेटमध्ये कासव अडकलेल्या स्थितीत असल्याचे संतोष खवणेकर, प्रविण (बाळा) पराडकर, महेंद्र कुबल, नारायण (दादू) लोणे या पारंपरिक मच्छिमारांच्या निदर्शनास आले. मग लगेच प्रविण (बाळा) पराडकर, महेंद्र कुबल यांनी पाण्यात जाऊन ते कासव घोस्ट नेटसह उचलून किनाऱ्यावर आणले. त्यानंतर संतोष खवणेकर यांनी चाकूच्या साहाय्याने दोरखंड कापून ते कासव घोस्ट नेट मधून सोडविले व नारायण (दादू) लोणे यांनी त्या कासवास सुखरूप समुद्रात सोडून जीवदान दिले.

त्या कासवाची फोटो व्हिडीओ संतोष खवणेकर व रोहन चिंदरकर याने युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेचा सदस्य अक्षय रेवंडकर यास दर्शविले असता त्याने ते समुद्री कासव दुर्मिळ लॉगरहेड असल्याचे सांगितले. हे कासव IUCN च्या यादीमध्ये असुरक्षित म्हणून सूचीबद्ध आहे. तसेच लॉगरहेड समुद्री कासव हे एक मोठे सागरी कासव आहे, ज्याला त्याच्या मोठ्या डोक्यामुळे हे नाव मिळाले आहे. ते जगातील सर्वात मोठे कठीण कवच असलेले कासव आहे. याचे डोके मोठे आणि मजबूत असते, ज्यामुळे ते शंख आणि कठीण कवच असलेल्या प्राण्यांना सहजपणे खाऊ शकते अशी माहिती अक्षय ने दिली.

विडियो पहा..

https://youtube.com/shorts/OPzWWKxfhAU?feature=share

rapan bottom