Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

बांधकाम कामगारांना मिळणार "अत्यावश्यक संच" भेट

बांधकाम कामगारांना मिळणार "अत्यावश्यक संच" भेट

महाराष्ट्र शासनकडून अत्यावश्यक संच सुधारित योजनेस मान्यता

श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती

निलेश जोशी | कुडाळ : इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य व सुरक्षा आणि कल्याणासाठी शासनाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. शासनाकडून कामगारांसाठी यापूर्वी गृहपयोगी वस्तुसंच व सुरक्षा संच योजनेचा लाभ कामगारांना देण्यात आलेला असून आता महायुती सरकारने पात्र नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच (Essential kit)वितरण योजनेस मान्यता दिली आहे. लवकरच वितरणा संदर्भात पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी दिली.
या अत्यावश्यक संचामध्ये पत्र्याची पेटी (Galvanized Trunk), प्लास्टिकची चटई (Plastic Mat), धान्य साठवण कोठी (क्षमता 25 किलो) ( Grain Storage Tank) (Capacity 25 kg), धान्य साठवण कोठी (क्षमता 22 किलो) ( Grain Storage Tank) (Capacity 22 kg) , बेडशीट (Bedsheet), चादर (Chaddar), ब्लॅंकेट (Blanket), साखर ठेवण्यासाठीचा डबा (क्षमता 1 किलो) (एस एस 202 ) ( Sugar Container) (1 Kg) (SS 201) , चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा (क्षमता 500 ग्रॅम) (एस एस 202 ) (Tea Container) (500 gram) वॉटर प्युरिफायर (18 लिटर) ( Water Purifier) (18 ltr) (SS 202) With 2 candle या वस्तूंचा समावेश असून लवकरच या संदर्भातील शासन स्तरावर निविदा प्रक्रिया कार्यवाही राबवून कामगार बांधवांना लाभ देण्याचे धोरण शासनाकडून आखण्यात आले आहे.
प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी प्रमाणित केलेल्या पात्र यादीनुसारच वितरण केले जाणार आहे. याशिवाय नव्याने नोंदणीत झालेल्या कामगारांना सुरक्षा संच वितरणास देखील कामगार विभागाने मान्यता दिली असून लवकरच वितरणा संदर्भात पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष श्री प्राजक्त चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिली असून गोरगरीब कामगारांच्या मूलभूत गरजा यांचा विचार करून कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.

rapan bottom