मालवण | प्रतिनिधी : शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते यांचा स्वागत सत्कार मालवण तालुका महिला शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आला.
महायुती आमदार निलेश राणे संपर्क कार्यालय मालवण येथे शिवसेना वर्धापनदिन कार्यक्रम साजरा झाला. यावेळी मालवण तालुका महिला शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने दीपलक्ष्मी पडते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला तालुका प्रमुख मधुरा तुळसकर, तालुका समन्वयक कविता मोंडकर, उपतालुका प्रियांका मेस्त्री, प्रियांका कुमावत, रिया कुबल, शीला लाड, गीता नाटेकर, शुभांगी परब, रश्मी तुळसकर, अल्पसंख्यांक शहरअध्यक मार्टिन फर्नांडीस, लुद्दीन फर्नांडिस, शुभांगी परब यांसह युवतीसेना जिल्हा पदाधिकारी युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, जिल्हा समन्वयक अंजना सामंत, रेवती राणे, श्रुती वर्दम आदी उपस्थित होते.

