नागरिकांनी मानले आभार
मालवण : नागरिकांची मागणी असलेल्या मालवण शहरातील जुन्या हॉटेल बांबू नजीकच्या पायवाटेवर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी मालवण नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांचा पाठपुरावा महत्वपूर्ण ठरला.
सदर पायवाटेचे काम पूर्ण झाल्याने स्थानिक नागरिक समीर मालवणकर, पूजा पराडकर, संगिता मालवणकर, संजय खाडिलकर, अंजु खोत, गणपत हिंदळेकर, आनंद दामले, अरविंद दामले, भक्ती दामले, विलास हिंदळेकर, सरिता साळकर, विनोद रेवंडकर, प्रथमेश करंगुटकर, सिद्धेश करंगुटकर, सरिता करंगुटकर यांनी समाधान व्यक्त करत यतीन खोत यांचे आभार मानले.

