Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

Kudal | शिवसेना पक्ष स्थापना दिवसानिमित्त कुडाळ तालुका शिवसेनेचा अनोखा उपक्रम

Kudal | शिवसेना पक्ष स्थापना दिवसानिमित्त कुडाळ तालुका शिवसेनेचा अनोखा उपक्रम

बेवारस गोवंशीय जनावरांना पशुखाद्याचे वाटप

निलेश जोशी | कुडाळ : शिवसेना पक्षाचा स्थापना दिवस आज सगळीकडे मोठया उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने शिवसेना मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. त्या अंतर्गत तुळसुली तर्फ माणगाव येथे आनंद वारंग यांनी सुरू केलेल्या बेवारस गोवंशीय जनावरांच्या गोशाळेत पशुखाद्य वाटप करण्यात आले.

कुडाळ तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून तुळसुली तर्फ माणगाव येथे श्री.आनंद वारंग यांनी सुरू केलेल्या बेवारस गोवंशीय जनावरांच्या गोशाळेत पशुखाद्य वाटप करण्यात आले. बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी नेण्यात येणारी गोवंशीय जनावरे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडून नाईलाजाने सोडून दिलेली तसेच अन्य बेवारस जनावरे यांचे पालनपोषण आनंद वारंग हे तुळसुली त माणगाव याठिकाणी दोन वर्षांपासून श्रीकृष्ण गोवर्धन गोशाळेच्या माध्यमातून स्वकष्टातून कोणत्याही प्रकारची शासकीय किंवा अन्य मदत न घेता करत आहेत. याठिकाणी सुमारे ६० हुन अधिक गोवंशीय भाकड जनावरे दाखल आहेत.या जनावरांना सुक्या चाऱ्याची कमतरता असल्याचे गोरक्षक स्वरूप वाळके यांनी लक्षात आणून दिल्यानंतर शिवसेना पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने कुडाळ तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने या जनावरांसाठी आवश्यक असणारा सुका चारा सुपूर्द करण्यात आला.


यावेळी शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते, शिवसेना नेते संजय पडते, शिवसेना जिल्हा सचिव दादा साईल, उप जिल्हाप्रमुख अरविंद करलकर त्याचप्रमाणे रत्नाकर जोशी, रचना नेरुरकर, नगरसेवक श्रुती वर्दम,  पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, अनिकेत तेंडोलकर, रेवती राणे, स्वरूप वाळके, शुभम नाईक, सुनील गायकवाड आदी उपस्थित  होते…

rapan bottom