Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

कुडाळ मध्ये न.पं. कडून प्लास्टिक जनजागृती मोहीम

कुडाळ मध्ये न.पं. कडून प्लास्टिक जनजागृती मोहीम

नक्षत्र टाॅवर आणि पोस्ट ऑफीस समोर घंटागाड्या आठवडा बाजारादिवशी उपलब्ध करून देण्यात येणार

निलेश जोशी | कुडाळ : नगरपंचायत प्रशासनाकडून आठवडा बाजारादिवशी बुधवारी शहरात फिरते भाजी, फळ विक्रेत्यांमध्ये प्लास्टिक बंदी आणि स्वच्छतेबाबत जनजागृतीपर मोहीम राबविण्यात आली.
न.पं.कडून शहरात प्लास्टिक बंदीबाबत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अंतर्गत व्यापारी, व्यावसायिक, फिरत्या विक्रेत्यांमध्ये जनजागृती करून, न.पं.ला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-यांवर दंडात्मक कारवाईही केली जात आहे. बुधवारी आठवडा बाजारादिवशी पोस्ट ऑफीस चौक ते जिजामाता चौक दरम्यान मुख्य रस्त्यालगत फिरत्या भाजी विक्रेत्यांकडून बाजार संपल्यानंतर तेथे टाकाऊ कचरा टाकला जात असल्याचा प्रकार समोर आला. याची दखल नगरपंचायत प्रशासनाने घेत, कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत न.पं.च्या पथकाने आज शहरात जनजागृतीपर मोहीम राबविली. नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर आणि मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या मार्गदर्शनाखाली न.पं.चे प्रशासकीय अधिकारी राजू पठाण, कर व मिळकत विभाग प्रमुख निलेश म्हाडेश्वर, लिपिक गजानन पेडणेकर, मुकादम दिपक कदम, रोहित परब, प्रविण कोरगावकर, केतन पवार, सतिश जाधव, साहिल कुडाळकर यांचा या पथकात समावेश आहे.
यावेळी काही फिरत्या भाजी विक्रेत्यांकडे प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. त्या जप्त करीत कारवाई करण्यात आली. तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करावा, तसेच बाजार संपल्यानंतर टाकाऊ कचरा, तेथेच रस्त्यालगत न टाकता, त्याच दिवशी न.पं.च्या घंटागाड्यांवर द्यावा. यासाठी नक्षत्र टाॅवर आणि पोस्ट ऑफीस समोर अशा दोन ठिकाणी घंटागाड्या आठवडा बाजारादिवशी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ध्वनिक्षेपकाद्वारे प्लास्टिक बंदीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. प्लास्टिकचा वापर केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला.

rapan bottom