Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

शिवसेनेत पक्ष प्रवेशांचा धडाका सुरूच !

शिवसेनेत पक्ष प्रवेशांचा धडाका सुरूच !

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवली सरपंच शामसुंदर वाक्कर व अनेक सहकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा देवलीत धमाका

मालवण कुडाळ मध्ये उबाठासह विरोधकांना जोरदार धक्के सुरूच

मालवण : मालवण कुडाळ तालुक्यात शिवसेनेत पक्ष प्रवेशांचा धडाका सुरूच आहे. देवली ग्रामविकास पॅनेलचे सरपंच शामसुंदर वाक्कर यांनीही गावातील अनेक सहकारी ग्रामस्थांसह आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. गेले काही दिवस मालवण कुडाळ मध्ये उबाठासह विरोधकांना जोरदार धक्के देणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी देवलीत जोरदार धमाका केला आहे.

दरम्यान, शिवसेना वाढत असताना सरपंच श्यामसुंदर वाक्कर यांच्यासारखी जनतेची हीत जोपसणारी माणसे पक्ष प्रवेश करत आहेत. याचा आनंद आहे. गावच्या विकासासाठी तुम्ही सांगाल ती कामे पुर्ण केली जातील. एकही विकासकाम गावात शिल्लक ठेवणार नाही. महायुती सरकारच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवू. अशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी देवली येथे दिली.

देवली वाघवणे येथील श्री देवी सातेरी मंदिर येथे पक्ष प्रवेश संपन्न झाला. यावेळी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, तालुकाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख विनायक बाईत, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, शहरप्रमुख दीपक पाटकर, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, अरुण तोडणकर, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, जिल्हा समन्वयक अंजना सामंत, महिला आघाडी मालवण तालुका प्रमुख मधुरा तुळसकर, तालुका समन्वयक कविता मोंडकर, उपतालुका प्रमुख प्रियंका मेस्त्री, प्रियांका कुमावत, लड्डिन फर्नांडिस, स्नेहा घाडीगावकर, रश्मी तुळसकर, मंदार लुडबे, भाई मांजरेकर यासह दीपक चव्हाण, विजय चव्हाण, रामू चव्हाण, गुरुनाथ पाटकर, आपा चव्हाण, दाजी चव्हाण, शिवदास चव्हाण, वासुदेव चव्हाण, मोहन चव्हाण, हरिश्चंद्र चव्हाण, अनिल आचरेकर, रुपेश आळवे, संदेश वेतुरेकर, संतोष आळवे, निलेश चव्हाण यावेळी चंदू चव्हाण, अत्युत्य चव्हाण, तुषार चव्हाण, गोविंद चव्हाण, आकाश बिरमोळे, अक्षय जाधव, सुधीर चव्हाण, शशांक चव्हाण, ऋषी चव्हाण, मंगेश गोवेकर, दत्ता गोवेकर, समीर आळवे, जगू हडकर, गणेश चव्हाण, चेतन भोगावकर, गणेश सारंग, राजा सावंत, अर्जुन चव्हाण, आशु चव्हाण, वैभव चव्हाण, हर्ष चव्हाण, रघुनाथ चव्हाण, काशीराम चव्हाण, रुपेश चव्हाण, सिद्धेश बिरमोळे, प्रियंका चव्हाण, आस्था चव्हाण, शोभा चव्हाण, अन्विता चव्हाण, दीप्ती चव्हाण, मीना चव्हाण, नंदिता चव्हाण, रुपाली चव्हाण, श्रीशा चव्हाण, वेधा चव्हाण, सीमा गोवेकर, यमुना चव्हाण, आरती चव्हाण, गार्गी चव्हाण यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

देवली गावातील सर्व प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सोडणार : दत्ता सामंत

आमदार निलेश राणे यांनी निवडणुकीच्या दरम्यान दिलेले शब्द सहा महिन्यातच पूर्ण केले आहे. आम्ही जनतेला दिलेले शब्द आमदार निलेश राणे पूर्ण करत आहेत. विधिमंडळात मतदार संघाचा हक्काचा आवाज आमदार निलेश राणे यांच्या रूपाने घुमत आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन व दिलेला शब्द पाळणारे आमदार या विश्वसाने अनेक पक्ष प्रवेश शिवसेनेत होत आहे. प्रवेशकर्त्यांचा शिवसेनेत सन्मान केला जाईल. देवली सरपंच ज्या विश्वासाने शिवसेनेत प्रवेश केला आहे तो विश्वास सार्थ ठरवणार. देवली गावातील सर्व प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सोडवले जातील असा विश्वास जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात विकासाचे राणे पर्व पुन्हा : संजय पडते

आमदार निलेश राणे हे आक्रमक नेतृत्व आहे. विकासकामासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. जनतेच्या हक्काचा आमदार निलेश राणे यांच्या रुपाने मतदार संघाला मिळाला आहे. जिल्ह्यात विकासाचे राणे पर्व पुन्हा सुरु झाले आहे असे संजय पडते यांनी सांगितले.

आमदार निलेश राणे यांच्या रूपाने देवली गावात विकासाचा राजमार्ग निश्चित झाला : सरपंच

देवली गावच्या इतिहासात सुवर्णं अक्षरांनी लिहिला जाणारा दिवस आहे. आमदार निलेश राणे यांच्या रूपाने गावात विकासाचा राजमार्ग निश्चित झाला आहे. विकासाची धमक असलेले नेतृत्व आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन गावच्या गतिमान विकासासाठी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे शामसुंदर वाक्कर यांनी प्रवेशादरम्यान सांगितले. जिल्ह्याच्या विकासात "राणे' हे केंद्रस्थान असल्याचे सरपंच यांनी अधोरेखित केले.

अमित खोत | मालवण

rapan bottom