Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांसाठी शिवराज भूषण महानाट्याच्या दोन प्रयोगांचे आयोजन

शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांसाठी शिवराज भूषण महानाट्याच्या दोन प्रयोगांचे आयोजन

मालवण | प्रतिनिधी : श्री शिवराज मंच मालवण आयोजित आणि निर्मित शिवराज भूषण या ऐतिहासिक महानाट्याचे सलग दोन प्रयोग १९ आणि २० जून रोजी मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे शालेय आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले आहेत.

शिवरायांचा तसेच कवी भूषण यांचा इतिहास नवीन पिढी पर्यंत पोहचावा आणि त्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, या हेतूने या नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही प्रयोगांसाठी मालवण शहर व जवळच्या गावातील शाळा, महाविद्यालये यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

मामा वरेरकर नाट्यगृह येथे शिवराज मंच तर्फे पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवराज भूषण महानाट्याचे दिग्दर्शक गणेश मेस्त्री, सूत्रधार समीर शिंदे, प्रकाश संयोजक हेमंत कोळंबकर आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी सादर होणाऱ्या या महानाट्याच्या प्रयोगाचे उदघाटन मालवण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी शिक्षण क्षेत्रातील अनेक शिक्षण संस्थांचे प्रमुख तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

या महानाट्याच्या निमित्ताने मामा वरेरकर नाट्यगृहात श्री शिवराज मंच यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची शस्त्रे, पुस्तके , प्रतिमा, चित्रे, मुर्त्या आणि पुस्तके यांचा समावेश असलेले 'शिवसाहित्य दालन' हे प्रदर्शन दि. १९ व २० जून रोजी सुरू राहणार आहे. शिवसाहित्य दालन शिवशंभू विचारमंच चे मुंबई मधील शिवभक्त आणि शिव व्याख्याते श्री प्रमोद कुंटे यांच्या सहकार्याने आयोजित केले आहे. या प्रदर्शनातून वस्तू खरेदीही करता येणार आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे महानाट्य पहावे तसेच नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शिवराज मंच यांच्या वतीने यावेळी करण्यात आले.

rapan bottom