कट्टा : आनंदी लॉ कॉलेजच्या इन्चार्ज प्रिन्सिपल मालवण तालुक्यातील कट्टा गावच्या सुकन्या ॲड. संपदा खटावकर पिसे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. त्यांनी "इक्वल जस्टीस अँड फ्री लीगल एड टू द पूअर विथ स्पेशल रेफ्रन्स टू कोल्हापूर डिस्ट्रिक्ट असोशिवो लीगल स्टडी" या विषयावर शोध प्रबंध सादर केला. यासाठी त्यांना डॉक्टर नारायण रायदुर्ग माजी प्राचार्य शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभले. याबाबत त्यांचे कौतुक केले जात आहे.

ॲड. संपदा खटावकर-पिसे यांना पीएचडी प्रदान
