Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

संग्राम साळसकर यांची युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

संग्राम साळसकर यांची युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

वरिष्ठ नेतृत्वाचे आभार

आमदार निलेशजी राणे साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील : संग्राम साळसकर

मालवण : शिवसेना पक्षाच्या युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष (कुडाळ, मालवण) पदी मालवण येथील युवा नेतृत्व संग्राम सुधीर साळसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना सचिव म्हणून यशस्वी जबाबदारी पार पाडणाऱ्या संग्राम यांच्या कार्याची दखल घेऊन त्याना जिल्हाध्यक्ष पदी बढती देण्यात आली असून पक्ष नेतृत्वाने त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.

दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, मुख्य सचिव राहुल लोंढे, सचिव किरण साळी यांच्या स्वाक्षरी पत्राने संग्राम सुधीर साळसकर यांची शिवसेना पक्षाच्या युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष (कुडाळ, मालवण)" पदी नियुक्ती करण्यात येत आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. आपल्या सामाजिक व राजकिय क्षेत्रातील भावी वाटचालीस मनः पुर्वक शुभेच्छा ! असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

नियुक्ती नंतर संग्राम साळसकर यांनी शिवसेना युवासेना सर्व वरिष्ठ नेतृत्वाचे आभार व्यक्त करताना आमदार निलेशजी राणे साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना अधिक बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. आमदार निलेश राणे साहेब यांनी मालवण कुडाळ मतदारसंघात विकास कामांचा धडाका लावला आहे. दहा वर्षे विकासाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या मतदारसंघाला नवसंजीवनी दिली. त्यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात काम करण्याची मिळालेली संधी माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे. अपेक्षित असे काम करण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे संग्राम साळसकर यांनी सांगितले आहे.

rapan bottom