Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये उद्बोधन कार्यक्रम

संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये उद्बोधन कार्यक्रम


नवीन प्रवेशार्थीचे पालकांसह स्वागत

निलेश जोशी | कुडाळ :  सध्या विद्यार्थी आणि पालक यांची प्रवेशासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे. आपण प्रवेश घेतलेल्या शाखेतून शिक्षण घेऊन पदवी मिळाल्यावर काय करता येईल, ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे ते महाविद्यालय आहे तरी कसे, वर्षभर शैक्षणिक उपक्रम कसे राबवले जातात, नवीन अभ्यासक्रम कसा आहे आदी सर्वांचा परिचय खासकरून विद्यार्थ्यांना व पालकांना व्हावा यासाठी बहुउद्देशीय उद्बोधन कार्यक्रम नुकताच संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता.
प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. रुपेश पाटकर या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले होते. त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेवर बोलत असताना त्यांच्या ओघवत्या शैलीमध्ये दैनंदिन जीवनामधील उदाहरणे देऊन तसेच स्वतःचे अनुभव सांगत अनेक मुद्यांवर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, प्रामुख्याने पालकांनी आपल्या पाल्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवले पाहिजेत आणि ते कशा पद्धतीने ठेवले पाहिजेत याबद्दल ते सविस्तर बोलले. प्रेम आणि आकर्षण यामध्ये काय फरक आहे आणि तो कसा ओळखावा, विद्यार्थ्यांनी़ भावना कशा पद्धतीने नियंत्रित कराव्यात त्याचबरोबर सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवला पाहिजे आणि तो कसा तयार केला पाहिजे तसेच आमिषाला बळी न पडता कशा पद्धतीने त्यापासून दूर राहिले पाहिजे आणि शेवटी स्वतःचा आनंद कसा शोधावा याबद्दल प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ.रूपेश पाटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.     
      महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांनी आपल्या महाविद्यालयाचा परिचय करून देत महाविद्यालयामध्ये असलेल्या सोयी -सुविधा आणि महाविद्यालयाची एकंदरीत आतापर्यंतची वाटचाल कथन केली आणि पालक व नूतन प्रवेशार्थींचे स्वागत केले.   
      उद्बोधन कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान क.म.शि.प्र.मंडळाचे श्री. भाईसाहेब तळेकर यांनी भूषविले. त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संगीत आणि आरोग्य या विषयी बोलत संगीताचे शिक्षणातील महत्त्व आणि बौद्धिक विकासासाठी संगीत कशा पद्धतीने आवश्यक आहे याची उदाहरणे देत कार्यक्रमाचे दुसरे वक्ते प्रवीण शेवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर विवेक देसाई आणि डॉ.रवींद्र ठाकूर उपस्थित होते .
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ.रवींद्र ठाकूर यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. कमलाकर चव्हाण यांनी केले.   या कार्यक्रमासाठी २८० पेक्षा जास्त विद्यार्थी व १६० पेक्षा जास्त पालकांसह महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.

rapan bottom