'डॅशिंग' नेतृत्व शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे
दिलदार मनाच्या राजा गावडे यांचे स्थान अनेकांच्या हृदयात 'खास'
सिंधुदुर्ग : राजकीय आणि सामाजिक जीवनात असे कार्य करावे की जनतेने त्या पक्षाचे आणि नेत्याचे नाव आदराने घेतले पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर अशी अनेक राजकीय व्यक्तिमत्व आहेत जी राणे साहेबांचे कार्यकर्ते म्हणून निश्चितच आदर्शवत ठरतात. यापैकीच एक राजकीय आणि सामाजिक पटलावरील कर्तृत्ववान असे निष्ठावंत व्यक्तिमत्व चौके गावचे सुपुत्र राजा गावडे हे होय..! अशा या कर्तृत्ववान नेतृत्वाला मालवण तालुका प्रमुख पदाची जबाबदारी वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशाने आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सोपवली असून राजा गावडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा तो खऱ्या अर्थाने सन्मान ठरला आहे.

राजा गावडे तन, मन आणि धन अर्पण करून गेली 3 दशके सेवा कार्य करतं आहेत. मदत कार्यात राजा गावडे यांची उपस्थिती प्रत्येकासाठी मोठा आधार ठरते. राजा गावडे यांच्या उपस्थितीनेच मार्ग निघतो. एखाद्या अत्यावश्यक स्थितीत रुग्णाला डॉक्टर उपचार तात्काळ मिळाले पाहिजेत यासाठी राजा गावडे यांची असलेली तत्परता, मदतीचा पुढाकार अनेकांसाठी देवदूता प्रमाणे ठरतो. मैत्रीला नेहमीच अग्रस्थानी ठेवणाऱ्या राजा गावडे यांचा मित्रपरिवार मोठा आहेत. मैत्रीच्या दुनियेत दिलदार मनाच्या राजा गावडे यांचे स्थान अनेकांच्या हृदयात 'खास' आहे. होय राजा गावडे खऱ्या अर्थाने 'राजा माणूस'आहे.
त्यासोबत सरपंच पदाचा अनुभव प्रशासनावर असलेला वचक आणि अभ्यासूपणा राजा गावडे यांचा अष्टपैलूपणा सिद्ध करणारा ठरतो. एक आपला माणूस, एक हक्काचा माणूस, आमचा माणूस म्हणून राजा गावडे यांचे जनतेच्या हृदयात स्थान आहे.
चौके गावचे सुपुत्र असलेले राजन शशिकांत गावडे गेली ३० वर्षे राजकारण, समाजकारणात सक्रिय आहेत. या ३० वर्षाच्या कार्यकाळात आपल्या कर्तृत्वाची छाप राजा गावडे यांनी निश्चितच उमटवली. त्या सोबतच निष्ठेच्या तराजूत राजा गावडे यांचे पारडे नेहमीच जड राहिले. राणे साहेबांचे निष्ठावंत हेच पद आपल्यासाठी सर्वोच्च पद राहिले आहे. आता मालवण तालुकाप्रमुख म्हणून पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत असताना आमचे हक्काचे आणि जिवाभावाचे आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवेला सर्वाधिक प्राधान्य राहील. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मोठा विकासनिधी प्राप्त होत असताना गावागावात विकासाची गंगा पोहचवणे, तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना सोबत घेऊन वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना संघटना तालुक्यात मजबूत करणे. यालाच सर्वाधिक प्राधान्य राहणार असल्याचे राजा गावडे सांगतात. त्यांचे तीन दशकातील जनमाणसातील कार्य पाहता ते निश्चितच पदाला यथोचित न्याय देतील यात शंका नाही…
.. या सर्वांची साथ मोलाची…!
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सर्वच ठिकाणी अनेक नेतृत्व तयार केली. राजा गावडे हे त्यापैकीच एक. राजा गावडे यांची वयाच्या १४ व्या वर्षी राजकारणात एन्ट्री झाली. १९९४ साली त्यावेळचे शिवसेना तालुकाप्रमुख अशोक तोडणकर यांनी राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राजा गावडे यांची चौके उपशाखाप्रमुख पदी नियुक्ती केली. त्यानंतर राजा गावडे यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. गावात एकहाती वर्चस्व निर्माण केले. चौके गावचे सरपंच ते शिवसेना मालवण तालूकाप्रमुख या त्यांच्या प्रवासात राणे साहेब, हक्काचे आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे स्थान महत्वाचे राहिले. त्यासोबत काका रमाकांत गावडे, वडील शशिकांत गावडे, मोठा भाऊ यांचे पाठबळ मार्गदर्शन मोलाचे असून ग्रामस्थ व मित्रपरिवार यांची साथ माझ्यासाठी सर्वस्व असल्याचे राजा गावडे आदराने सांगतात.
खऱ्या अर्थाने 'राजा' माणूस
राजा गावडे यांचा मित्र परिवार मालवणच नव्हे तर अनेक ठिकाणी आहे. राजा नेहमी माणसे जोडत गेला. जे आहे ते बोलून टाकायचे मनात काहीच नाही. निर्मळ मनाचा आणि मदतीला धावून जाणारा राजा खरोखर मैत्रीच्या दुनियेतील जनतेच्या हृदयातील राजा माणूस आहे. अश्या भावना अनेक मित्रपरिवाराच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या आहेत. राजा आपल्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा…!


















