Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळवून देणार : आमदार निलेश राणे

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळवून देणार : आमदार निलेश राणे

कुडाळ एस.टी. आगारास प्राप्त पाच बसचे आमदार राणेंच्या हस्ते लोकार्पण

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळच्या एस. टी. बस स्थानकामध्ये काय चुका झाल्या, त्याच्यावर टीका करण्यापेक्षा आता सत्ता आपली आहे त्यामुळे प्रवाशांना आवश्यक असलेल्या सुविधा देण्याची जबाबदारी आपली आहे. त्या सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्या सुधारणा करण्यासाठी मी प्रयत्न करेन असा शब्द आमदार निलेश राणे यांनी दिला. कुडाळ बसस्थानकात दाखल झालेल्या 'लाल परी' लोकार्पण सोहळा वेळी ते बोलत होते.
कुडाळ एसटी बस आगाराला प्राप्त झालेल्या ५ लाल परी बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कुडाळ एस. टी. बस स्थानक येथे संपन्न झाला. यावेळी यंत्र अभियंता सुजित डोंगरे, विभागीय स्थापत्य अभियंता अक्षय केंकरे, कुडाळ एस टी बस आगार प्रमुख रोहित नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, ओरोस तालुकाप्रमुख दीपक नारकर, भाजपा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, शहर प्रमुख ओंकार तेली, संघर्ष समितीचे निलेश तेंडुलकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, पावशी सरपंच वैशाली पावसकर, रेवती राणे, आबा धडाम, संजय भोगटे, सुनील बांदेकर, राकेश कांदे, वाहतूक निरीक्षक पल्लवी मोरे आदी उपस्थित होते.
या लोकार्पण सोहळ्यावेळी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, कुडाळ एस. टी. बस आगाराच्या अनेक समस्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी मी कटीबद्ध आहे‌. ही सेवा प्रवाशांसाठी मिळते. त्यामुळे ती सेवा चांगल्या प्रकारे मिळावी ही आमची धारण आहे. त्यामुळेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना आमच्या मागण्या दिल्या आहेत. अजून ज्या काही मागणी आहे त्या पूर्ण करण्यासाठी मी पाठपुरावा करत राहीन. ज्यांनी चुका केल्या आहेत त्याच्यावर टीका करण्यापेक्षा त्या सुधारणा करण्यावर मी भर देणार आहे.


ते पुढे म्हणाले, कुडाळ शहरांमध्ये अनेक समस्या आहेत. सर्वात मोठी समस्या ही वाहतूक कोंडीची आहे. ही समस्या सोडवण्यासाठी पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नगरपंचायत यांच्या बैठक घेऊन वाहतूक कोंडीचे नियोजन केले जाणार असे सांगून अभिमन्यू हॉटेल ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत अतिक्रमण हटवून रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. यासाठी काँक्रीटीकरण रस्ता करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच कुडाळ पोलीस ठाणे समोरच्या त्रिकोणी शासकीय जागेमध्ये सुशोभीकरण करण्याचा आमचा मानस आहे. हे शहर एकविसाव्या शतकातील दिसलं पाहिजे, वाटलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आम्ही करणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगून पिंगुळी पर्यंत जाणारा रस्ता सुद्धा रुंदीकरण केला जाणार आहे असे त्यांनी सांगितले. कुडाळ आगार जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात क्रमांक एकचे करू अशी ग्वाही त्यानी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहतूक नियंत्रक महादेव आंबेस्कर यांनी केले. आभार दिनेश शिरवलकर यांनी मानले.

आमदार निलेश राणे यांनी केला एस. टी‌. बसचा प्रवास

कुडाळ एस. टी. बस आगाराला मिळालेल्या ५ लाल परी बस लोकार्पण सोहळा झाल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी या लालपरी बसमधून एसटी बस स्थानक ते कुडाळ पोलीस ठाण्यापर्यंत प्रवास केला. यामध्ये कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.

rapan bottom