Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवून सोन्याचे दागिने लुटले

लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवून सोन्याचे दागिने लुटले



मालवणातील तरुणाची फसवणूक

संशयित आरोपीला मालवण पोलिसांनी १२ तासात केली अटक 

न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी

अमित खोत | मालवण : लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवत मालवण तालुक्यातील कांदळगांव येथील तरुणाची फसवणूक करतं सुमारे ८२ हजार किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या संशयीत आरोपी
संतोष वसंत माळकर मूळ राहणार मळगाव तालुका सावंतवाडी सध्या राहणार शिर्डी यास रत्नागिरी जिल्ह्यात अलोरे पोलीस ठाण्याचे हद्दीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने मालवण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, गुन्ह्यातील रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले फोर्ड गाडी  तसेच सोन्याचे व चांदीचे दागिने असे मिळून २ लाख ३५ हजरांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याला अटक करून मालवण न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास सुरु असल्याची माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

दरम्यान आरोपीने रायगड जिल्ह्यामध्ये पोलादपूर तसेच दादर सागरी पोलीस ठाणे येथेही गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे. अशीही माहिती प्राप्त झाल्याचे पोलिसांनी सांगितले. संतोष वसंत माळकर यांच्या पत्नी वरही गुन्हा दाखल असून तिचीही चौकशी सुरु आहे. अशी माहिती मालवण पोलिसांनी दिली.


कांदळगांव येथील रोहन विलास कोदे हे कोल्हापूर येथे गेले असता एका ठिकाणी त्यांची ओळख संतोष माळकर, सायली माळकर यांच्या सोबत झाली. काही दिवसांनी पुन्हा भेट झाली. त्यानंतर आरोपीने कोदे यांना लग्न जुळवून देतो असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर मुलीला दागिने बनवूया असे सांगून फसवणूक करून कोदे यांच्या आईचे जुने सोन्याचे व चांदीचे सुमारे 82400 किमतीचे दागिने घेऊन पळून गेला होता.सदर नमूद प्रकरणी मालवण  पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक श्री कृषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी  श्री घनश्याम आढाव यांनी गुन्ह्याच्या तपासा अनुषंगाने तात्काळ तपास पथक रवाना करणे बाबत आदेश केले होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कोल्हे, पो. उप.नि. विलास टेंबुलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद नाईक, हेमंत पेडणेकर, पोलीस हवालदार धोंडू जानकर सुशांत पवार, सुहास पांचाळ यांनी संशयीत आरोपीला रत्नागिरी येथे प्रवासात ताब्यात घेतले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. असे पोलिसांनी सांगितले.

rapan bottom