Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सिंधुदुर्गात पावसाळी पर्यटन बहरणार!

सिंधुदुर्गात पावसाळी पर्यटन बहरणार!



सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा पुढाकार

कार्यवाह नितीन वाळके यांची माहिती

मालवण : सागरी किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळी पर्यटनाकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने पर्यटन व्यवसायिकांच्या साथीने पावसाळी पर्यटनाला प्रोत्साहन देत विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. येथील पर्यटन बारमाही सुरु राहण्याच्यादृष्टीने पावसाळी पर्यटन ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने महासंघाने पुढाकार घेतला असल्याचे व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी सांगितले.

दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या सुचने नुसार महासंघ तयार करीत असलेल्या सिंधुदुर्गाच्या व्यापार धोरणात समाविष्ट करावयाच्या पर्यटन व्यवसाय विषयक बाबींवरही महासंघ व पर्यटन व्यावसायिक यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. असेही नितीन वाळके यांनी सांगितले.


मालवण येथील हॉटेल चैतन्य मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत नितीन वाळके हे बोलत होते. यावेळी मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, मालवण तालुका व्यापारी संघांचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर, बाळू अंधारी, गणेश प्रभुलकर, हर्षल बांदेकर आदी उपस्थित होते.

यंदाच्या पर्यटन हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात मे महिन्यात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय व या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या घटकांचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. पर्यटन व्यावसायिकांसाठी मे महिना हा पुढील पावसाळ्याच्या काळासाठी बेगमीच काळ असतो. पावसाळ्याचे तीन महिने पर्यटन बंद असते. याचा विचार करता पावसाळा कालावधीत निसर्गाने मुक्त उधळण केलेली अनेक ठिकाणे पर्यटकांनी गजबजून जावीत या दृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.


यावेळी नितीन वाळके म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पर्यटन व्यवसायिक, मच्छिमार, आंबा व्यावसायिक, व्यापारी यांसह इतर व्यवसायिकांवर आर्थिक संकट कोसळले. या नुकसानीचे परिणाम गणेश चतुर्थी काळात निश्चित पहायला मिळतील. कारण मे महिना हा या व्यवसायांसाठी बेगमीचा काळ असतो. हंगामातील ५० टक्के उलाढाल १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिन्याच्या काळात होते. पर्यटनच्या दृष्टीने तर हा अतिशय महत्वाचा काळ आहे. मात्र मे महिन्यात पाऊस पडल्याने येथील समुद्री पर्यटन, किल्ला होडी सेवा व इतर पर्यटन व्यवसाय ठप्प झाले. वर्षातील पावसाचे तीन महिने पर्यटन बंद असताना अशा नैसर्गिक आपत्तीमुळेही पर्यटन व्यवसायाचे नुकसान होत आहे. त्यामुळे आता पावसाळी पर्यटन विकसित होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा व्यापारी संघाने जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिकांची बैठक घेऊन पावसाळी पर्यटनासाठी काय काय करता येईल, कोणते उपक्रम घेता येतील यावर चर्चा करून तातडीच्या उपाययोजना व दीर्घकालीन उपाययोजना ठरविण्यात आल्या. याची अंमलबजावणी लवकरच सुरु करण्यात येणार आहे, असेही नितीन वाळके म्हणाले.

जिल्ह्यात पावसाळी पर्यटनालाही मोठा वाव आहे. यामध्ये जिल्हातंर्गत पर्यटन संधी देखील भरपूर आहेत.

डिस्काउंट मिळणार

पर्यटन व्यावसायिकांसोबत झालेल्या बैठकीत काही तात्काळ उपाययोजना ठरविण्यात आल्या. यामध्ये ज्येष्ठ पौर्णिमा ते नारळी पौर्णिमा या काळात येणाऱ्या पर्यटकांसाठी व्यापारी वर्गाकडून त्यांच्या दुकानात डिस्काउंट स्कीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये व्यापारी आपल्या दुकानातील वस्तू खरेदीवर पर्यटकांना काही टक्के सवलत देतील. तसेच दुसऱ्या पद्धतीत व्यापारी व पर्यटन व्यावसायिक आपापसात समन्वय करून डिस्काउंट कुपन योजना राबवतील. यामुळे पर्यटकांच्या मनात सकारात्मक तसेच सुरक्षिततेची भावना निर्माण होऊन येत व्यापारी एकमेकांशी जोडले गेले आहेत, हे पर्यटकांवर बिंबवले जाईल.

देवदर्शन व जंगल सफारी

जिल्ह्यातील टूर ऑपरेटर यांच्याशी संपर्क करून श्रावण महिन्यात देवदर्शन उपक्रम राबविण्यात येईल. त्याच प्रमाणे जंगल दर्शन या संकल्पनेतही मोठा वाव असून ती राबविण्यासाठी प्रयत्न होतील. कातळशिल्प याठिकाणीही पर्यटक आकर्षित होतील.

खेकडे पकडणे, हुक फिशिंग सोबत शेती सफर

पावसाळ्यातील खेकडे पकडणे, हुक फिशिंग, पक्षी निरीक्षण, भात शेती मधील सफर, सह्याद्री पट्ट्यातील रिव्हर रफ्टिंग असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

प्रचार आणि प्रसिद्धी होणार

पावसाळी पर्यटनामध्ये सर्वांना सामावून घेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सायकल मॅरेथॉन आयोजित करण्यात येणार आहे. गणेश चतुर्थी नंतर सप्टेंबर महिन्यात सागर ते सह्याद्री अशी मोटरसायकल रॅली काढून सह्याद्री मधील सुंदर जंगलांची माहिती घेता येईल, यां रॅलीत सुमारे ५०० ते ७०० मोटारसायकल चालक सहभागी होतील. तसेच मालवणची ऐतिहासिक नारळी पौर्णिमा व नारळ लढविणे स्पर्धा हे कार्यक्रम देखील पर्यटनाच्या दृष्टीने पुढे आणणार आहोत. या सर्व उपक्रमांच्या प्रचार प्रसिद्धीची जबाबदारी जिल्हा व्यापारी संघ घेणार असून यासाठी अनेक माध्यमे तसेच युट्युबर्स यांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे, असेही नितीन वाळके म्हणाले.

शासनाचे लक्ष वेधणार

पावसाळी दीर्घकालीन उपाययोजनामध्ये शासनाचे सहकार्य आवश्यक असणार आहे. यामध्ये गेले अनेक वर्षे रखडलेला सिवर्ल्ड प्रकल्प येत्या पाच वर्षात मार्गी लागवा अशी आमची शासनाकडे मागणी असून हा प्रकल्प झाल्यास जिल्ह्यातील पर्यटनाला प्रचंड मोठा आयाम मिळेल. तसेच पावसाच्या दिवसात कोकणात येण्यासाठी वाहतुकीच्या रेल्वे मार्ग, महामार्ग, घाट रस्ते यांच्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पावसाळ्यात कोकण रेल्वेची रो - रो सेवा कार ऑन व्हील च्या धर्तीवर राबवावी, यामुळे रेल्वेतूनच पर्यटकांच्या कार कोकणात दाखल होतील. तसेच चिपी विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरु करावे, पर्यटन गाईड नेमणे व त्यांना प्रशिक्षण देणे, जिल्ह्यातील अप्रकाशित पर्यटनस्थळे समोर आणणे, तसेच पर्यटनाच्या विविध प्रकारानुसार पर्यटनाची वेगवेगळी सर्किट तयार करणे, असे दीर्घकालीन उपाय राबविण्याचे ठरविण्यात आले, असेही नितीन वाळके यांनी सांगितले.

पालकमंत्री नितेश राणे यांची विशेष सूचना

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या सुचने नुसार महासंघ तयार करीत असलेल्या सिंधुदुर्गाच्या व्यापार धोरणात समाविष्ट करावयाच्या पर्यटन व्यवसाय विषयक बाबींवरही महासंघ व पर्यटन व्यावसायिक यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. असेही नितीन वाळके यांनी सांगितले.

rapan bottom