Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

मालवण राजकोट येथे भव्य दिव्य शिवसृष्टी उभारणार!

मालवण राजकोट येथे भव्य दिव्य शिवसृष्टी उभारणार!

शिवसृष्टी आराखडा आर्थिक तरतुदीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मान्यता

पालकमंत्री नितेश राणे यांची होती आग्रही भुमिका

मुंबई | प्रतिनिधी : मालवण राजकोट येथे शिवसृष्टी उभारण्या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात आज बैठक पार पडली. या बैठकीत नियोजीत शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला मान्यता देण्यात आली.या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे व संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यामुळे पर्यटनाला भरघोस चालना मिळत आहे. पर्यटकांचा तेथे ओघ पाहता पुतळ्याच्या आजुबाजूचा परिसर सुशोभीत करून शिवसृष्टी उभारण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे प्रयत्नशील व आग्रही होते. आज या बैठकीत संभाव्य शिवसृष्टीचे सादरीकरण करण्यात आले.

सादरीकरण पाहून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. ही शिवसृष्टी उभारतांना तेथील वाऱ्याच्या वेगाचा विचार करून निर्मिती करावी असे निर्देश ही उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिले.

या शिवसृष्टीला अंदाजे ८३.४५ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षीत असून आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे.पालकमंत्री नितेश राणे यांनी ही शिवसृष्टी लवकर होण्यासाठी आग्रही भुमिका मांडली.

rapan bottom